Crop Insurance : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

हवामानावर आधारित फळपीक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २२ हजार ३४८ आंबा, काजू फळपिकांचा बागायतदारांनी आतापर्यंत विमा उतरविला आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

सिंधुदुर्गनगरी ः हवामानावर आधारित फळपीक योजनेअंतर्गत (Fruit Crop Insurance) जिल्ह्यातील २२ हजार ३४८ आंबा, काजू फळपिकांचा बागायतदारांनी आतापर्यंत विमा (Crop Insurance) उतरविला आहे. पीक क्षेत्र सरंक्षित करण्यासाठी अजूनही चार दिवस शिल्लक असून, बागायतदारांनी तातडीने पीकविमा क्षेत्र संरक्षित करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या (Agriculture Department) वतीने करण्यात आले आहे

Crop Insurance
Crop Insurance : पीक विमा- चेष्टा नको, हक्काचे पैसे द्या

अवेळी पाऊस, कमी आणि अधिक तापमान, गारपीट, अतिवृष्टी, वारा, यासह विविध नैसर्गिक आपत्तीत फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यातून शेतकरी कोलमडून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य कायम राहावे या हेतुने शासनाने फळपीक विमा योजना सुरू केली.

या योजनेत कोकणातील आंबा आणि काजू या फळपिकांचा समावेश आहे. पाच वर्षांवरील आंबा, काजू पीक क्षेत्र संरक्षित करता येते. या पीकविमा योजनेचा अधिकाधिक बागायतदारांनी लाभ घ्यावा यासाठी कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी चित्ररथ तयार केला होता.

Crop Insurance
Rabi Crop Insurance : रब्बीसाठी पीकविमा योजनेत भाग घ्यावा

दरम्यान, आतापर्यंत सिंधुदुर्गातील १६ हजार १८७ आंबा, तर ६ हजार १६१ काजू बागायतदारांनी फळपीक क्षेत्र संरक्षित केले आहे. पीक क्षेत्र संरक्षित करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. गेल्या वर्षी २८ हजार आंबा, काजू बागायतदारांनी पीक क्षेत्र संरक्षित केले होते.

या क्षेत्रावरील झालेल्या नुकसानीपोटी बागायतदारांना ८० कोटी रुपये भरपाई मिळाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा हजार बागायतदारांनी अजूनही पीक क्षेत्र सरंक्षित केलेले नाही. अधिकाधिक शेतकऱ्यांनी तातडीने विमा उतरवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यात आंबा, काजूचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. उत्पादनक्षम आंबा, काजू बागायतदारांनी आपले पीक क्षेत्र संरक्षित करावे. जेणेकरून नैसर्गिक आपत्ती झाल्यास त्यांना भरपाई मिळू शकते. ३० नोव्हेंबरपर्यंत अधिकाधिक बागायतदारांनी फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा
दत्तात्रय दिवेकर, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com