Government Project
Government Project Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Government Project : ‘चला जाणूया नदीला’ अभियानास आज प्रारंभ

टीम ॲग्रोवन

मुंबई/ वर्धा : गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील ७५ नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी आज (ता. २) गांधी जयंतीपासून (Gandhi Jayanti) प्रारंभ होणार आहे. वर्धा येथील सेवाग्राममध्ये आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह (Dr. Rajendra Singh) यांच्या उपस्थितीत ‘चला जाणूया नदीला‘ (Chala Januya Nadila) महोत्सवाची सुरुवात होणार आहे. पूर आणि दुष्काळाचा (Wet Drought) अभ्यास करणे, भूजल पातळी उंचावण्यासह अन्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या अभियानाचे आयोजन केले आहे.

राज्यातील नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे. राज्याला पूर आणि दुष्काळमुक्त करण्यासाठी समाजाच्या सहभागाला पाठबळ देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. २ ऑक्टोबरला वर्धा येथील कार्यक्रमात राज्यातील विविध ७५ नद्यांचे ११० जलनायक सहभागी होतील.

त्यांच्याकडे डॉ. सिंह, जलबिरादरीचे सदिच्छादूत अभिनेते चिन्मय उदगीरकर, मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जलकलश आणि ध्वज सुपूर्द केला जाईल. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी १५ ऑक्टोबरला राज्यातील ७५ नद्यांवर एकाच दिवशी नदी यात्रेला सुरुवात होईल. त्यामध्ये नदी अभ्यासक, नदीप्रेमी, शेतकरी, विद्यार्थी, सरकारी अधिकारी सहभागी होतील.

प्रत्येक नदीच्या यात्रेवेळी किमान १०० जणांचा सहभाग राहील. २६ जानेवारी २०२३ पर्यंत ही नदी यात्रा होणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत महसूल विभागाचे आणि ग्राम विकास विभागाचे अपर मुख्य सदस्य सचिव आहेत. वने विभागाचे प्रधान सचिव या समितीचे कार्याध्यक्ष असतील.

जलसंपदा, जलसंधारण, कृषी, शालेय शिक्षण, नगरविकास, पर्यावरण, उद्योग, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, पाणी पुरवठा व स्वच्छता या विभागांचे प्रधान सचिव यांच्यासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक, महाराष्ट्र जैवविविधता मंडळ, नागपूर, पुण्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक, सांस्कृतिक कार्यचे सचिव आणि जल व भूमी व्यवस्थापन संस्था, अर्थात वाल्मी या समितीत सदस्य असणार आहेत. समितीमध्ये अशासकीय सदस्यही असणार आहेत.

डॉ. राजेंद्र सिंग विशेष निमंत्रित आहेत. डॉ. सुमंत पांडे, नरेंद्र चौघ, जयाजी पाईकराव, रमाकांत कुलकर्णी, डॉ. गुरुदास नुलकर, अनिकेत लौयीया, राजेश पंडित, महेंद्र महाजन या समितीचे सदस्य आहेत. समितीचा कार्यकाळ एक वर्ष अथवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत असेल.

नद्यांच्या आरोग्याकडे लक्ष वेधणार

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांची प्रेरणा घेऊन त्यास तरुणांमधील ऊर्जा आणि त्यांचा दृष्टिकोन जोडण्यात येणार आहे.

आपल्या आणि समाजापुढील प्रश्नांची सोडवणूक करण्याची ऊर्जा तरुणांमध्ये आहे. तरुण स्वतः आणि देशवासीयांच्या आरोग्याविषयी सजग आहेत आणि ते काळजी घेताहेत. त्यातूनच आपले आरोग्य सुदृढ राखण्यासाठी नदीचे आरोग्य ठीक करण्याचा संकल्प तरुणांसोबत महाराष्ट्रातील जनतेने केला आहे. त्याचअनुषंगाने हा महोत्सव होत असल्याची माहिती महाराष्ट्र जलबिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुग यांनी दिली.

अंमलबजावणी समितीचे ध्येय आणि उद्दिष्ट्ये...

महाराष्ट्रातील पूर आणि दुष्काळ समस्यांपासून मुक्तीसाठी नदी संवाद अभियानाचे आयोजन

नागरिकांना नदीसाक्षर करणे

अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसुदा तयार करणे

नदीचे स्वास्थ आणि मानवी आरोग्य याबाबत रूपरेषा आखणे

नदीचा तट आणि प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार करणे

पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करून कार्यवाही अहवाल सादर करणे

पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करून कार्यवाही अहवाल सादर करणे पावसाचे पाणी अडवून भूजलस्तर उंचावणे नद्यांवरील अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषणाच्या कारणांचा अभ्यास आणि त्याचा नदी व मानवी जीवनावर होणार परिणाम अभ्यासणे राज्यातील ७५ नद्यांच्या खोऱ्यांतून नदी संवाद यात्रेसाठी आराखडा बनविणे शासनाबरोबर समाज आणि नदीवर काम करणाऱ्या संस्थांमध्ये सुसूत्रता आणणे स्थानिक स्वराज्य संस्था यांचे जलव्यवस्थापन तपासणे

राज्यातील ७५ नद्यांचे संवर्धन करीत असताना या नद्यांची सद्यःस्थिती नेमकी काय आहे. नदी संवर्धन करताना काय करणे आवश्यक आहे, याची दिशा मिळण्यास या महोत्सवाच्या माध्यमातून मदत होणार आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमात लोकसहभाग मिळाला तरच हा महोत्सव यशस्वी होईल, नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे

- सुधीर मुनगंटीवार,

सांस्कृतिक कार्यमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT