Kharip Sowing Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Subsidize Seed : शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणांचा अनुदानाच्या दराने पुरवठा करणार

ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमात शेतकऱ्यांना बियाणे परमीटवर वाटप करण्यात येणार आहे.

टीम ॲग्रोवन

बारामती : कृषी उन्नती योजना (Krushi Unnati Yojana) २०२२- २३ अंतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम (Seed Production Program) राबविण्यात येणार असून, कृषी विभाग (Agriculture Department) व महाबीजमार्फत शेतकऱ्यांना कडधान्य, गळीतधान्य व तृण धान्याचे प्रमाणित बियाणे अनुदानाच्या दराने पुरवठा करण्यात येणार आहे, असे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी सांगितले.

ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमात शेतकऱ्यांना बियाणे परमीटवर वाटप करण्यात येणार आहे. बारामती, दौंड, इंदापूर व पुरंदर तालुक्यांत हरभरा बियाण्यांच्या १० वर्षांच्या आतील वाणास प्रत्येकी ३५ क्विंटल, १० वर्षांवरील वाणास प्रत्येकी ५५ क्विंटल, गहू बियाण्यांच्या १० वर्षांच्या आतील वाणास बारामती व इंदापूर तालुक्यांसाठी प्रत्येकी १३ क्विंटल, दौंड व पुरंदरसाठी १४ क्विंटल व १० वर्षांवरील वाणास बारामतीसाठी ८६, दौंडसाठी ९५, इंदापूर व पुरंदरसाठी प्रत्येकी ८० क्विंटल बियाणे वाटपाचे लक्षांक ठरवण्यात आले आहे. महाबीज कंपनीचे बियाणे विक्रेते पुढीलप्रमाणे :

बारामती ः महालक्ष्मी ॲग्रो एजन्सी, तालुका खरेदी-विक्री संघ बारामती सर्व शाखा. इंदापूर ः कृषी संपदा एजन्सी इंदापूर, गणेश कृषी केंद्र, इंदापूर, महाराष्ट्र अॅग्रो एजन्सी, भिगवण, श्रीराम कृषी केंद्र, भवानीनगर. दौंड ः नितीन ॲग्रो एजन्सी, केडगाव, तालुका खरेदी-विक्री संघ, केडगाव, शिवशक्ती कृषी केंद्र, राहू, अतुल कृषी सेवा केंद्र, पारगाव. पुरंदर ः विकास ॲग्रो एजन्सी, सासवड, शेती उद्योग भंडार, सासवड, तालुका खरेदी-विक्री संघ सासवड व पी. एम. व्होरा अॅग्रो एजन्सी, नीरा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : सप्टेंबरमधील पीकनुकसानीपोटी ६४ कोटी ६१ लाख रुपये निधी वितरणास मंजुरी

Crop Damage : नांदेडमध्ये सप्टेंबरमध्ये ३२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Gokul Dudh Dar: 'गोकुळ'कडून म्हैस, गायीच्या दूध खरेदी दरात १ रुपयाने वाढ, पशुखाद्य दरात ५० रुपयांची कपात

Farmer Protest: अतिवृष्टी, अपुरी मदत आणि रखडलेली कर्जमाफीसाठी किसान सभेचे २२ ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन

Mango-Cashew Crop Damage : बागायतदार आर्थिक संकटात

SCROLL FOR NEXT