Shivraj Singh Chouhan Statement On Seed Bill: नवीन बियाणे विधेयक शेतकऱ्यांचे संरक्षण करेल. परदेशी उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत अनियंत्रित प्रवेश मिळणार नाही. तर यामुळे देशांतर्गत नियामक व्यवस्था मजबूत होईल, असे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. पुढील महिन्यात संसदेत हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यात निकृष्ट दर्जाच्या बियाणे विक्री प्रकरणी दंडाची रक्कम ५०० रुपयांवरून ३० लाख रुपयांपर्यंत वाढण्याची तरतूद आहे. तसेच जाणीवपूर्वक अशा बियाण्यांची विक्री अथवा उत्पादन केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले..हे नवीन विधेयक १९६६ चा बियाणे कायदा आणि १९८३ बियाणे (नियंत्रण) आदेश यांची जागा घेईल. कृषिमंत्री चौहान यांनी या विधेयकाबद्दल व्यक्त केले जात असलेले आक्षेप फेटाळून लावले आहेत. हे बिजोत्पादन, पेरणी, संर्वधन, देवाणघेवाण आणि विक्री अधिकारांचे संरक्षण करेल, असा दावा त्यांनी केला आहे..यामुळे पारंपारिक बियाण्यांवर परिणाम होऊ शकते, असा गैरसमज पसरवला जात आहे. पण हे खरे नाही. या विधेयकातील तरतुदी शेतकरी आणि त्यांच्याकडील बियाणे वाणांना लागू होणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे..Seed Bill: नवीन बियाणे विधेयकाला किसान सभेकडून विरोध.शेतकरी स्वतः उत्पादन घेत असलेल्या बियाणांची पेरणी करु शकतात. शेतकरी इतर शेतकऱ्यांनाही बियाणे देऊ शकतात. शेतकऱ्यांनी पीक लागवडीच्या वेळी बियाणे एकमेकांना देऊन आणि त्यानंतर सव्वापट प्रमाणात बियाणे परत देण्याची पद्धत कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. .Fertilizer Black Marketing: राज्यात खतांचा काळाबाजार थांबेना! ८ महिन्यांत ४४ हजार छापे, निकृष्ट दर्जावरून १,१३९ परवाने रद्द, निलंबित.बियाणे विधेयकांत शेवटची सुधारणा १९६० च्या दशकात करण्यात आली होती, जरी तेव्हापासून त्यात सुधारणा करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. या बियाणे विधेयकाच्या मसुद्यावर ९ हजार सूचना प्राप्त झाल्या असून, त्याचा कृषी मंत्रालयाकडून अभ्यास केला जात आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात हे विधेयक सादर करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील.....तर दंडात्मक कारवाई कंपन्यांकडून विक्री होत असलेली बियाणे तपासण्यासाठी विधेयकात ठोस उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. जर बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले अथवा ते उगवले नाही तसेच इतर कोणतीही समस्या निर्माण झाली तर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे चौहान यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.