Banana Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Banana Crop Insurance : केळी पीकविम्याची रक्कम कर्जखात्यात वर्ग करू नये

केळी पीकविम्याची रक्कम गुरुवारपासून (ता. १) विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ही रक्कम कर्ज खात्यात वर्ग न करता शेतकऱ्यांना द्यावी, अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार रवींद्र माळी यांना देण्यात आले.

टीम ॲग्रोवन

चोपडा, जि. जळगाव : केळी पीकविम्याची (Banana Crop Insurance) रक्कम गुरुवारपासून (ता. १) विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ही रक्कम कर्ज (Agriculture Loan) खात्यात वर्ग न करता शेतकऱ्यांना द्यावी, अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार रवींद्र माळी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले, की केळीसाठी घेतलेले पीककर्ज भरून शेतकऱ्यांनी नवीन पीककर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेडीची मुदत पुढील वर्षी असताना काही बँका त्या कर्ज खात्यात ती रक्कम जमा करून घेत असल्याने शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकांना व दैनंदिन कामासाठी लागणाऱ्या खर्चासाठी हातातील हक्काचा पैसा गेल्याने अडचणी येत आहेत.

दुर्दैवाने आता केळीचे नुकसान झाले व शेतकरी थकबाकीदार झाला तर पुढील विमा जो चालू कर्जासाठी बँकेने काढला आहे, त्यातून ते कर्ज वसूल होऊ शकते. त्यामुळे बँकेचे कुठलेही नुकसान नाही. तरी बँका शेतकऱ्यांना छळत आहेत. जिल्ह्यातील बऱ्याचशा बँका व पतपेढी या रिझर्व्ह बँकेच्या साऱ्या नियमांचे व कायदेशीर गोष्टींचे पालन न करता कर्जदार शेतकऱ्यांकडे सावकारी पद्धतीने तीन, चार कर्मचारी रोज पाठवून शेतकऱ्यांना हैराण करीत आहेत.

त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ बँकांना निर्देश द्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर एस. बी. पाटील, नितीन निकम, भागवत महाजन, हारून बागवान, दीपक धनगर, मेहमूद बागवान, गुलाबराव निकम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Lumpy Skin : लातूर जिल्ह्यात बारा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

Warna Dam : वारणा धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

Tur Crop : खानदेशात तूर पीक जोमात

SCROLL FOR NEXT