Banana Rate : देशी केळीला अपेक्षित दर नाहीच

श्रावणापूर्वी देशी केळीचे दर ३५ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत होती, पण श्रावण व गणेशोत्सवाच्या मागणीच्या कालावधीतही केळीचे दर ३० हजार रुपयांपर्यंत टिकून आहेत.
Banana Rate
Banana RateAgrowon

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा देशी केळीलाही अपेक्षित दर (Indigenous Banana Rate) मिळत नसल्याची स्थिती आहे. सध्या टनास २५ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंतचा दर आहे. श्रावणापूर्वी देशी केळीचे दर (Banana Rate) ३५ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत होती, पण श्रावण व गणेशोत्सवाच्या मागणीच्या (Banana Demand) कालावधीतही केळीचे दर ३० हजार रुपयांपर्यंत टिकून आहेत.

Banana Rate
Banana : केळीसाठी ‘मनरेगा’ची होणार अंमलबजावणी

यंदा राज्यात केळीचे क्षेत्र कमी आहे. यामुळे मध्यंतरीच्या काळात ‘जी ९’ (वसई) केळीचे दर २२ हजार रुपये टनांपर्यंत गेले होते. मात्र गेल्या काही दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी केळीच्या दरात घसरण झाली. सध्या हा दर १३०० ते १४०० रुपयांपर्यंत कमी आल्याचे मजले (ता. हातकणंगले) येथील अविनाश पाटील यांनी सांगितले. साधारणतः या केळीच्या दुप्पट देशी केळीस भाव मिळतो, असे समीकरण आहे. पण या केळीचे दरही कमी झाल्याने याचा फटका देशी केळीला बसत असल्याचे चित्र आहे.

Banana Rate
Banana Rate : केळीच्या दर प्रश्नी समिती गठित

ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत सर्वच केळीचे दर चांगले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून मात्र ऐन सणासुदीच्या कालावधीतही केळीचे दर म्हणावे तसे वाढले नाहीत. याचा परिणाम देशी केळीवरही झाला. इतर प्रकारच्या केळीच्या तुलनेत देशी केळीचे उत्पादन घेणारे शेतकरी कमी आहेत. अगदी काही गुंठ्यांमध्येच देशी केळीचे उत्पादन घेऊन त्याची किरकोळ विक्री करण्याकडे देशी केळी उत्पादकांचा कल असतो. बाजारपेठेमध्ये याचे ग्राहक ठरलेले असल्याने देशी केळीला नेहमीच मागणी असते. श्रावण व गणेशोत्सवाच्या कालावधीत देशी केळीला उचांकी दर मिळतील, अशी शक्यता होती. पण दर ३० हजार रुपये टनांच्या आसपास टिकून आहेत. गणेशोत्सव कालावधीत दरात किरकोळ वाढ झाल्याचे देशी केळी उत्पादकांनी सांगितले.

दिवाळीपर्यंत दर वाढण्याची शक्यता

नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील बाबूराव पाटील यांच्याकडे जवळपास २२५ रोपे देशी केळीची आहेत. गेल्या महिन्यापासून ते विक्रीत व्यस्त आहेत. ते या केळीची स्वतः बाजारात जाऊन विक्री करतात. सध्या देशी केळीला डझनाला ४० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. पूर्ण सेंद्रिय पद्धतीने त्यांची देशी केळी बाग आहे. अगदी क्वचितप्रसंगी घरात येऊन नेणारे ग्राहकच केळीसच ६० ते ७० रुपयांपर्यंत दर देत आहेत. बाजारात मात्र ही केळी विकताना वेगळा अनुभव असल्याचे पाटील यांनी सांगितले. बाजारात देशी केळीस आकारमानानुसार ४० ते ५० रुपये डझनाचाच भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीपर्यंत काहीसे दर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दोन वर्षांपूर्वी ३५ हजार रुपये प्रतिटन दराने देशी केळी विकली होती. यंदा ३२ हजार रुपयांपर्यंत दर वाढण्याची अपेक्षा होती. पण सध्या ३० हजार रुपयांच्या आसपासच दर आहे. अन्य केळीचे दर कमी झाल्याने देशी केळीला ही दर कमी झाला आहे.
सुनील पाटील, शेतकरी, वाशी (ता. करवीर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com