POCRA Project
POCRA Project Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

POCRA Project : ‘पोकरा’ प्रकल्पात वाटप केलेल्या अवजारे बँका चौकशीच्या फेऱ्यात

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यात गेल्या काळात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) शेतकरी गट, कंपन्यांना वितरित केलेल्या अवजारे बँका, मालवाहतूक वाहने आदी घटकांची एकाच वेळी तपासणी सुरू झाली आहे.

शेजारच्या बुलडाणा जिल्ह्यातील मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षकांची चमू यासाठी गुरुवारी (ता. २०) सकाळीच जिल्ह्यात दाखल झाली आहे. आता या समितीच्या पाहणीत नेमकी काय तथ्ये बाहेर येतात याचीच चर्चा कृषी खात्यात होत आहे.

अकोला जिल्ह्यात पोकरा प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास ८० पेक्षा जास्त अवजारे बँका वितरित झालेल्या आहेत. काही माल वाहतूक वाहनेही देण्यात आली. या अवजारे बँका तसेच वाहनांच्या वाटपात अनियमितता झाल्याचा सुरुवातीपासूनच संशय घेतला जात आहे.

या बँका वाटपासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण- घेवाणीचे व्यवहार झाले होते. एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडल्याचा प्रकार समोर आला होता.

मात्र या प्रकरणात कारवाई केवळ एका विरुद्ध झाल्याने आजही आश्‍चर्य व्यक्त केले जाते. दरम्यान, गेल्या काळात जिल्ह्याच्या कृषी विभागाबाबत झालेल्या तक्रारींची चौकशी करण्याचे काम वाशीमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या नेतृत्वात नेमलेल्या समितीने केले होते.

या समितीचा गोपनीय अहवाल विभागीय कृषी सहसंचालकांकडे सादर झालेला आहे. या अहवालात समितीने अनेक गंभीर बाबींचा थेट उल्लेख केलेला आहे.

या समितीनेच पोकरा अंतर्गत दिलेल्या लाभाची चौकशी करण्याबाबत शिफारस केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर आता विभागीय कृषी सहसंचालकांच्या आदेशानुसार बुलडाणा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर एकाच वेळी चौकशीची जबाबदारी देण्यात आली.

याबाबत बुधवारी (ता. १९) बुलडाणा जिल्हा अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली मूल्यसाखळी बैठक घेत त्यामध्ये चौकशीसाठी नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना करण्यात आल्या.

चौकशीसाठी ४५ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून, त्यांचे गट बनवण्यात आले. तालुक्यानुसार जबाबदाऱ्या देण्यात आल्या. एका गटाकडे त्या त्या तालुक्यातील पाच ते सहा बँका तपासणीची जबाबदारी सोपविल्याचे सूत्राने सांगितले.

चौकशी समितीच्या शिफारशीनंतर अकोला जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडूनच सुरुवातीला या बँकांची तपासणी केली गेली. तेव्हा या चौकशी व माहितीवर संशय घेतला गेला. त्यानंतर आता विभागीय सहसंचालकांनी पुन्हा चौकशीसाठी शेजारच्या जिल्ह्यातील समिती नेमल्याने तथ्ये बाहेर येण्याची अपेक्षा जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Crop Advisory : पेरु पीक सल्ला

Banana Crop Advisory : केळी पीक सल्ला

Gadhinglaj Sugar Factory : गडहिंग्लज कारखान्याची साखर रोखणार, कामगार संघाकडून पोलिसांना निवेदन

Kolhapur Rain : कोल्हापुरात पुढचे ५ दिवस पावसाची शक्यता, वारा, गारा, धारा कोसळणार

Mango Success Story : पुरळ गावाचा हापूस आंब्यात लौकिक

SCROLL FOR NEXT