Shetmal Taran Yojana
Shetmal Taran Yojana Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Shetmal Taran Yojana : शेतमाल तारण योजना ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान

Team Agrowon

Marketing Board : कृषी पणन व्यवस्थेत (Agriculture Marketing System) आधुनिकीकरण आणि सुधारणांसह पणन व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विविध प्रकल्प, योजना (Agriculture Scheme), नवीन कार्यक्रमांची आखणी यासह शेतकरी आणि शेतकरी संस्थांच्या विकासासाठी पणन मंडळ काम करत आहे.

राज्यात शेती मालाच्या निर्यातीसाठी निर्यात सुविधा केंद्रांची उभारून ती सक्षमपणे चालवण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी पणन मंडाळामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. यापैकीच एक शेतमाल तारण कर्ज ही योजना (Shetmal Taran Yojana) शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे.

योजनेचा उद्देश

बाजारातील शेतमालाच्या उतरत्या किंमतींमुळे काढणीच्या हंगामातील आर्थिक नुकसान टाळून राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळ शेतमाल तारण कर्ज योजना राबवत आहे.

राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून १९९० पासून ही राबवली जात आहे. पिकाच्या काढणी हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक गरज लक्षत घेवून गरजेच्यावेळी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

शेतमाल तारण कर्ज योजनेची वैशिष्ट्ये -

या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, हरभरा, धान, करडई, ज्वारी, बाजरी, गहू, मका, बेदाणा, काजू बी, हळद, सुपारी आणि राजमा या शेतमालाचा समावेश आहे. शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारण म्हणून ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत ६ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते.

सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हे कर्ज त्वरित उपलब्ध करुन दिले जाते. बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी गोदाम भाडे, विमा, देखरेख खर्च इत्यादी खर्चाची जबाबदारी बाजार समितीवर असल्याने शेतकऱ्यांवर याचा अतिरीक्त ताण येत नाही.

व्याज सवलत

या योजनेंतर्गत सहा महिन्याच्या आत कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजर समित्यांना तीन टक्के व्याज सवलत देण्यात येते. तसेच ज्या बाजार समित्या स्वनिधीतून तारण कर्ज वाटप करतात, अशा बाजार समित्यांना कर्जाच्या रकमेवर तीन टक्के व्याज सवलत दिली जाते.

याशिवाय ज्या बाजार समित्या स्वनिधीतून योजना राबवू शकत नाही, अशा बाजार समित्यांना पणन मंडळाकडून पाच लाख रुपयांचा अग्रिम निधी उपलब्ध करून दिला जातो. राज्य वखार महामंडळाच्या गोदामातील शेतकऱ्यांच्या मालाच्या वखार पावतीवर तारण कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.

कर्जाची मुदत आणि व्याजदर

या योजनेसाठी शेतमालाच्या प्रकारनुसार कर्ज दिले जाते.

  • राजमा - राजम्यासाठी बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा तीन हजार रुपये प्रति क्विंटल यापैकी कमी असणारी रक्कम सहा महिने मुदतीसाठी सहा टक्के व्याजदराने देण्यात येते.

  • काजू बी व सुपारी - काजू बी आणि सुपारीसाठी बाजार भावानुसार एकूण किमतीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त १०० रुपये प्रति किलो यापैकी कमी असणारी रक्कम सहा महिने मुदतीसाठी सहा टक्के व्याजदराने देण्यात येते.

  • बेदाणा - बेदाणा पिकासाठी एकूण किंमतीच्या कमाल ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त सात हजार ५०० प्रति क्विंटल यातील कमी असणारी रक्कम सहा महिने मुदतीसाठी सहा टक्के व्याजदराने देण्यात येते.

यंदाच्या २०२२-२३ हंगामात पणन मंडळामार्फक राज्यातील ६१ बाजार समित्यांनी या योजनेंतर्गत तीन हजार २६९ शेतकऱ्यांना एकूण ३९ कोटी ९८ लाख रुपये कर्ज दिले. कर्जापोटी शेतकऱ्यांकडून एकूण एक लाख ४७ हजार २९३ क्विंटल शेतमाल तारण ठेवण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT