Agriculture Subsidy Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Subsidy : वाळवातील शेतकऱ्यांना ६.३३ कोटींचे अनुदान

शासनाच्या कृषी विभागामार्फत २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत वाळवा तालुक्यातील १ हजार ५७१ शेतकऱ्यांना विविध अभियानांमार्फत ६ कोटी ३३ लाख इतके अनुदान जमा झाल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली.

Team Agrowon

इस्लामपूर, जि. सांगली ः शासनाच्या कृषी विभागामार्फत (Department of Agriculture) २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत वाळवा तालुक्यातील १ हजार ५७१ शेतकऱ्यांना विविध अभियानांमार्फत ६ कोटी ३३ लाख इतके अनुदान (Agriculture Subsidy) जमा झाल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली.

राष्ट्रीय कृषी विकास योजना, कृषी यांत्रिकीकरण अभियान, राज्य कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अभियानाअंतर्गत २०२१-२२ या वर्षासाठी ५९६ शेतकऱ्यांना ३ कोटी ३३ लाख ८० हजार रुपये अनुदान मिळाले. तर २०२२-२३ मध्ये १५४ शेतकऱ्यांना ७३ लाख २४ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. २०२१ ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत ठिबक सिंचन योजना या अभियानाअंतर्गत ८२१ शेतकऱ्यांना २ कोटी २६ लाख रुपये अनुदान जमा झाले.

असे २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत वाळवा तालुक्यातील १ हजार ५७१ शेतकऱ्यांना विविध योजना अभियानाअंतर्गत ६ कोटी ३३ लाख इतके अनुदान बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे.

योजनांचा लाभ कसा घ्याल

प्रथम शेतकऱ्यांनी महा-डीबीटी या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन आपली स्वतःची सर्व माहिती भरून प्रोफाइल तयार करावी. ज्यामध्ये शेत जमीन उतारा, आधार कार्ड, बँक खात्याबाबत माहिती भरावी. त्यानंतर आपणास आवश्यक त्या अभियानात सहभागी व्हावे. यासाठी २३ रुपये ६० पैसे इतकी फी आहे. काही दिवसांनी सर्व सहभागी शेतकऱ्यांच्या यादीचा लकी ड्रॉ पुणे आयुक्त कार्यालयातून काढला जातो. ज्या शेतकऱ्यांचे नाव लकी ड्रॉमध्ये समाविष्ट आहे, अशा शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

सर्व प्रकारच्या अभियान योजना पारदर्शक पार पडत आहेत. सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला यात सहभागी होता येत आहे. याबाबत काही समस्या असल्यास शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

- संजय खार्गे,

तालुका कृषी अधिकारी, वाळवा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT