Takari Irrigation Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Irrigation Scheme : सीना-माढा योजनेसाठी ५० कोटी मंजूर ः आमदार शिंदे

आमदार शिंदे यांनी सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेसाठी निधीची मागणी करून निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

Team Agrowon

Irrigation Scheme टेंभुर्णी : माढा तालुक्यात हरितक्रांती (Green Revolution) घडविणारी सीना-माढा उपसा सिंचनेसाठी (Irrigation Scheme) नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.

आमदार शिंदे यांनी सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेसाठी निधीची मागणी करून निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. माढा तालुक्यातील ही योजना २००४ साली कार्यान्वित झाली.

या योजनेद्वारे माढा तालुक्यातील १६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असून लाभक्षेत्रातील बंधारे, ओढे, नाले, विहिरी, पाझर तलाव भरून घेण्यात येत आहेत. त्यामुळे भुगर्भातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

आमदार शिंदे यांचे नेतृत्वाखाली विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्याने ही योजना चालविण्यात येत असून योग्य नियोजनुळे गेल्या १९ वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. या योजनेमुळे माढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार झाले आहे.

शेतकरी व शेतमजुरांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे तर अनेक लहान मोठ्या उद्योगांना चालना मिळून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच शेतीपूरक उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाल्याचेही दिसून येत आहे.

या निधीमधून योजनेच्या मुख्य कालव्याच्या ''लायनिंगचे'' काम प्रामुख्याने करण्यात येणार आहे. याचप्रमाणे भूसंपादन तसेच मोडनिंब विभागातील सोलंकरवाडी, जाधववाडी, वैरागवाडी आदी ठिकाणच्या कालव्याची कामे तत्परतेने केली जाणार आहेत. अनेक ठिकाणी कालव्याचे गेट (दरवाजे) खराब झाले आहेत ते बदलण्यात येणार आहेत.

तसेच अत्यावश्यक ठिकाणी नवीन गेट्स बसवण्याचेही नियोजन आहे, अशी माहिती आमदार शिंदे यांनी दिली आहे. साखर कारखान्याच्या सहकार्यामुळे या योजनेचे वीजबील कधीही थकीत राहिलेले नाही.

तसेच मशिनरी दुरुस्ती किंवा पाइपलाइन लिकेज दुरुस्तीसाठी कारखान्याची यंत्रणा नेहमी सज्ज असते. सध्या या योजनेतून उन्हाळी आवर्तन सुरू असून तालुक्यातील ४० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT