Onion Warehouse Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Kanda Chal Anudan : वीस जिल्ह्यांत होणार ५ हजार ७०० कांदाचाळी

Onion Warehouse Subsidy : कांदा उत्पादकांना कांदाचाळीसाठी अनुदान देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून यंदा ५१ कोटी रुपयांच्या निधीला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : कांदा उत्पादकांना कांदाचाळीसाठी अनुदान देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून यंदा ५१ कोटी रुपयांच्या निधीला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या रकमेतून राज्यातील २० जिल्ह्यांत ५ हजार ७१४ कांदाचाळी उभारण्याचे उद्दिष्ट आहे. कांदा उत्पादनात अग्रेसर नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे या जिल्ह्यांत उद्दिष्ट अधिक आहे.

राज्यात दरवर्षी साधारण ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. खरिपासह, लेट खरीप, रब्बीत आणि उन्हाळी हंगामात कांदा लागवडीवर शेतकऱ्यांचा भर असतो. गेल्या वर्षी पाण्याची उपलब्धता चांगली होती.

त्यामुळे दरवर्षीपेक्षा सुमारे २० टक्के अधिक क्षेत्रावर लागवड झाली होती. कांदा उत्पादनानंतर त्याची साठवण करण्यासाठी अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे कांदाचाळ नाही. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २५ टन क्षमतेच्या कांदाचाळीसाठी ८७ हजार ५०० रुपये शासन अनुदान देते.

दरवाढीचा परिणाम

कांदाचाळीसाठी लोखंड, सिमेंट, जाळीचा अधिक वापर होतो. गेल्या दीड वर्षापासून लोखंडासह सर्वच साहित्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे साधारण ५ टन क्षमतेच्या कांदाचाळीसाठी किमान ३ लाखांचा खर्च येतो. शासन मात्र दहा वर्षांपूर्वी निश्‍चित केलेल्या १ लाख ७५ हजार रुपये गृहीत धरूनच अनुदान देते.

अनुदान वाढीबाबत चर्चा सुरू होती. दीड वर्षापूर्वी येथील कृषी उपसंचालक रवींद्र माने यांच्यासह राज्यातील काही अभ्यासू अधिकाऱ्यांकडून लागणाऱ्या खर्चाबाबत कृषी विभागाने अहवाल मागितला होता. मात्र त्यावर अजून काहीच निर्णय नाही. त्यामुळे वाढत्या दराचा कांदाचाळ उभारणीवर परिणाम होत आहे.

कांद्याचाळींचे उद्दिष्ट (कंसात रक्कम)

नाशिक ः ५२५ (५ कोटी ४७ लाख), धुळे ः ३८० (३ कोटी ३२ लाख ५० हजार), नंदुरबार ः १९२ (१ कोटी ६८ लाख), जळगाव ः १९० (१ कोटी ६६ लाख), पुणे ः २७५ (२ कोटी ४० लाख), नगर ः ५९० (५ कोटी १६ लाख), सोलापूर ः २८६ (२ कोटी ५० लाख), छत्रपती संभाजीनगर ः ५९५ (५ कोटी २० लाख ६२ हजार),

जालना ः ४४० (३ कोटी ८५ लाख ५० हजार) बीड ः ४४३ (३ कोटी ८७ लाख), लातूर ः २८८ (१ कोटी ९९ लाख ५० हजार), नांदेड ः १३२ (१ कोटी १५ लाख ५० हजार), परभणी ः ३४० (२ कोटी ९७ लाख ५० हजार),

हिंगोली ः ६३ (५५ लाख १२ हजार), धाराशीव ः ३३५ (२ कोटी ९३ लाख), अमरावती ः ८२ (७१ लाख ७५ हजार), अकोला ः ११८ (१ कोटी ०३ लाख), वाशीम ः ११८ (१ कोटी ०३ लाख), यवतमाळ ः ९२ (८० लाख ५० हजार) बुलडाणा ः १९० (१ कोटी ६६ लाख)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Drill Subsidy: हिंगणघाट बाजार समिती देणार अनुदानावर पेरणी यंत्र

Farmer Insurance App Issue: ॲप, टोल फ्री नंबरवर तक्रारीची नोंद होईना!

Avocado Farming Success: दिवे येथे अ‍ॅव्होकॅडो फळपीक उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

Farmer Death: कसमादे पट्ट्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Sugar Industry Growth: साखर उद्योगाला चालना मिळणार

SCROLL FOR NEXT