Farmer Suicide Cases: वातावरणीय बदल आणि आर्थिक संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सततची नापिकी आणि शेतमालाच्या कोसळलेल्या भावामुळे आधीच संकटात असलेल्या बळीराजाचे कंबरडे गेल्या आठवड्यात झालेल्या पूर्वमोसमी पावसाने आणि गारपिटीने पार मोडले आहे. याच नैराश्यातून गेल्या दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत..पहिली घटना मालेगाव तालुक्यातील देवघाट येथे घडली. येथील ३१ वर्षीय तरुण शेतकरी मयूर सुरेश देसले यांनी शनिवारी (ता. ४) सकाळी आपल्या राहत्या घराशेजारील शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मयूर कुटुंबातील कर्ता मुलगा होते..Farmer Death: कर्जबाजारी युवा शेतकऱ्याची नदीत उडी घेऊन आत्महत्या.घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच होती, मात्र सरकारी कर्ज, सततची नापिकी आणि नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे झालेले नुकसान यामुळे ते प्रचंड तणावाखाली होते. कृषी विभागाने नुकताच त्यांच्या शेताचा पंचनामा केला होता. नैराश्य आल्याने शनिवारी (ता. ४) सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी विषारी औषधाचे सेवन केले..Farmer Death: माळेगावात विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू; मदतीला धावलेल्या युवकाचाही दुर्दैवी अंत.मामेभाऊ विशाल सूर्यवंशी यांनी त्यांना तातडीने येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. फैजी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दुसरी घटना बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथे घडली. येथील ५४ वर्षीय शेतकरी राजेंद्र रामदास भामरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेंद्र हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून होते. बाजारभाव मिळत नसल्याने ते गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत होते..त्यातच पूर्वमोसमी पावसामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने, उसने घेतलेले पैसे कसे परत करायचे, या चिंतेतून त्यांची आर्थिक घडी विस्कटली होती. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर काळे, मंडल अधिकारी, तलाठी यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.