Rain Impact on Farming: वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची तक्रार विमा योजनेचे मोबाईल ॲप व टोल फ्री नंबरवर करण्याचा विमाधारक केळी उत्पादक प्रयत्न करत आहेत. पण तक्रार नोंदवली जात नाही, अशी माहिती जिल्ह्यातील उत्पादकांनी दिली..जिल्ह्यात २०२५-२६ च्या हंगामाच्या अनुषंगाने हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीचे काम भारतीय कृषी विमा कंपनीच्या अखत्यारित येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात या योजनेत नियमबाह्य सहभागाच्या संशयावरून एमआरसॅक (महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर) तंत्राने पीक पडताळणी व अपात्र केळी विमाधारकांना नोटिसा यांचा खेळ सुरूच आहे..याचा हकनाक त्रास प्रामाणिक केळी विमाधारकांना भोगावा लागत आहे. विमा कंपनी व कृषी विभागाकडून अशा केळी उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.या कारणांच्या पार्श्वभूमीवरच, तक्रारींची नोंद होत नसावी, असा आरोप केळी उत्पादकांनी केला आहे..Unseasonal Rain Crop Damage: पूर्वमोसमी पावसाचा हळद, कांदा, आंबा उत्पादकांना तडाखा.ॲपवर अर्ज प्रलंबितज्यांच्या शेतात केळी आहे, अशा प्रामाणिक विमाधारकांचे विमा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विमा योजनेच्या पोर्टलवर मंजूर दिसत आहेत. पण याच शेतकऱ्यांचे विमा अर्ज किंवा प्रस्ताव ‘क्रॉप इन्शुरन्स’ या सरकारी ॲपवर मात्र प्रलंबित दिसत आहेत. संबंधित विमाधारकांच्या प्रस्तावासंबंधी ‘डॉक्युमेंट पेंडिंग’ असा मेसेज या ॲपमध्ये दिसत आहे..यातच जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीचा धुमाकूळ मागील आठवड्यात सुरू होता. ॲपचा उपयोग करून किंवा १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून केळी विमाधारकांना आपल्या नुकसानीची तक्रार नुकसान झाल्यापासून ७२ तासांत करायची आहे. पण या क्रमांकावर संपर्क करूनही तक्रार दाखल होत नाही व ॲप यासंदर्भातील अर्ज प्रलंबित असल्याचे दाखवत असल्याने विमाकंपनी तक्रार दाखल करून घेत नसल्याची स्थिती आहे..Pune Crop Damage: हाती आलेले पीक गारपिटीने मातीमोल.विमा कंपनी व कृषी विभागाने विमा योजनेतील उत्पादकांच्या नियमबाह्य सहभागाबाबत धडक व अतिजलद काम केले. तसेच, काम प्रामाणिक केळी विमाधारकांबाबतही करावे. त्याचबरोबर, सध्या अडचणी असल्याने केळी नुकसानीसंबंधी कृषी विभागाने ऑफलाइन अर्ज स्वीकारावेत, अशी मागणी विमाधारकांकडून होत आहे..नुकसानग्रस्तांनी तूर्तास विमा योजनेच्या ॲपवर तक्रार दाखल करू नये. तक्रार दाखल करण्यासाठी १४४४७ या टोल फ्री क्रमांकाचा उपयोग करावा. ज्या प्रामाणिक केळी विमाधारकांचे अर्ज ॲपवर प्रलंबित दिसत आहेत, ते लवकरच मंजूर होतील.अमित पवार, जिल्हा समन्वयक, भारतीय कृषी विमा कंपनी, जळगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.