Solar Energy  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Solar Energy Project : ‘सौर कृषी’साठी ४१ ठिकाणची दीड हजार एकर जागा हस्तांतरित

Agriculture Electricity : मराठवाडा विभागात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagr News : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जिल्ह्यातील काही तालुक्यांतील ४१ ठिकाणची एकूण १ हजार ५२९ एकर गायरान जमीन सर्व विभागांच्या एनओसीसह महावितरण कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

या संदर्भात सोमवारी (ता. २८) मुंबईत बैठक झाली. प्रकल्प पूर्ण होताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसाही सवलतीच्या दरात वीज मिळणे शक्य होणार आहे. मराठवाडा विभागात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.

येथे पथदर्शी म्हणून हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर विभागात त्याचा विस्तार होईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात दिवसा शेतीला पाणी देता यावे, या उद्देश्याने ही योजना हाती घेण्यात येत आहे. १०४ ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यांत ४७ ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्पासाठी जागांची पाहणी करण्यात आली होती.

त्यापैकी ४१ जागा जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांच्या एनओसींसह एमएसईबीला हस्तांतरित केल्या असून, एकूण १५२९ एकर गायरान जमीन त्यासाठी दिली आहे. त्याचा करारनामाही नुकताच करण्यात आला आहे.

अडचणींमुळे ६ ठिकाणचे प्रस्ताव तूर्तास थांबविले आहेत. या ४१ क्लस्टरमधून १३८ मेगावॉट वीजनिर्मिती या सौरऊर्जा प्रकल्पातून होणार आहे. ३ रुपये प्रति युनिट वीज शेतकऱ्यांना मिळेल, असा प्राथमिक अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT