
Nashik News : शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून राज्यासह नाशिक जिल्ह्यात कृषी फीडर सौरऊर्जित करून सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून कृषिपपांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे.
जिल्ह्यात एकूण १८८ विद्युत उपकेंद्र सौर ऊर्जिकरण होणार असून, यामधून ७ हजार ९०० एकर जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्यात येऊन १ हजार ५८० मेगावॉट वीजनिर्मित होणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ६९ उपकेंद्रांच्या नजीक २ हजार ३६५ एकर तसेच क्लस्टर्सच्या व्यतिरिक्त १७ विद्युत उपकेंद्रांसाठी ६७६ एकर अशी एकूण ३ हजार ४१ एकर शासकीय जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाली असून, सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषिपपांना दिवसा वीजपुरवठा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
राज्यातील ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषी वीजवाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे. अशा कृषी वीजवाहिन्यांचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करून दिवसा आणि भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी जमीन तातडीने उपलब्ध व्हावी याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० अंतर्गत नाशिक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नाशिक ०१, ०२ आणि ०३ अशा तीन क्लस्टर्सची निवड करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ८४ विद्युत उपकेंद्र सौर ऊर्जीकरण होणार आहे. यासाठी एकूण ३ हजार ३४० एकर जमिनीची गरज लागणार आहे.
त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ३५ विद्युत उपकेंद्रांसाठी १ हजार ५७२ एकर जमिनीची परिपूर्ण उपलब्धता झालेली आहे. तर ३४ विद्युत उपकेंद्रांसाठी अंशता ७९३ एकर जमीन उपलब्ध झाली आहे. तसेच जिल्ह्यातील क्लस्टर्सच्या व्यतिरिक्त १७ विद्युत उपकेंद्रांसाठी ६७६ एकर जमीन उपलब्ध झाली आहे.
अशी एकूण नाशिक जिल्ह्यात ३ हजार ४१ एकर जमीन उपलब्ध झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या जमिनीच्या भाडे करारावर जिल्हाधिकारी यांनी स्वाक्षरी केलेली असून, या भाडेकराराची दस्त नोंदणीची कार्यवाही सुरू आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.