Animal Husbandry Agrowon
संपादकीय

Ecosystem : पशुपालनात उद्योजकतेची ‘इको सिस्टिम’

Livestock Farming : पशुपालनात केवळ उद्योजक घडवूनही चालणार नाही, तर त्यांना लागणारी सर्व ‘सपोर्ट सिस्टिम’ही विकसित करायला हवी.

विजय सुकळकर

Animal Husbandry : आपल्या देशात शेतीबरोबरच, किंबहुना त्याही आधी पशुपालन हा व्यवसाय सुरु झाला. पशुपालन या व्यवसायाने अगदी सुरुवातीपासून शेतीला आधार देण्याचे काम केले. एवढेच नव्हे तर शेतमजुरांपासून ते अल्प-अत्यल्प भूधारक शेतकरी चार दोन शेळ्या-मेंढ्या, एखादी गाय, थोड्याफार कोंबड्या असे काही ना काही पाळत आला आहे, त्यातून मिळणाऱ्या दूध, मांस, अंड्यांच्या उत्पादनांनी अशा शेतकरी कुटुंबाला आर्थिक हातभार लावला आहे.

याशिवाय मोठ्या प्रमाणावर गाई, म्हशी, कुक्कुटपालन करून दुग्ध, अंडी उत्पादनात क्रांती केलेले शेतकरीही देशात कमी नाहीत. परंतु अलीकडच्या हवामान बदलाच्या काळात शेतीत जोखीम वाढली आहे. नेमक्या अशावेळी पशुपालन व्यवसायाला केंद्रस्थानी ठेवून त्यास बळकटी देऊ, असे मत केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायमंत्री राजीव रंजन सिंह यांनी व्यक्त केले आहे.

भारत हा जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश आहे. अंडी उत्पादनातही आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत, तर मांस उत्पादनात आपला क्रमांक जगात चौथा म्हणजे वरचाच लागतो. असे असताना या देशातील दूध, अंडी, मांसोत्पादन हे व्यवसाय विखुरलेल्या स्वरूपात असून उत्पादक अडचणीत आहेत. पशुपक्षी संवर्धन व दुग्ध व्यवसायात केंद्र तसेच राज्य शासन विविध योजना, कार्यक्रम राबविते.

परंतु बहुतांश योजना अनेक पशुपालकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे या विभागाच्या योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करताना त्या योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील, हेही पाहावे लागेल. वर्षानुवर्षे अनेक पशुपालक पारंपरिक पद्धतीने पशुपालन करीत आले आहेत, परंतु त्यांना उद्योजक बनता आलेले नाही. पारंपरिक व्यवसायाचे उद्योगात रूपांतर करण्यासाठीचे मार्गदर्शन, प्रशिक्षण, अर्थसाह्य यांसह बहुतांश पशुपालकांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव हे त्यामागील मुख्य कारणे आहेत.

अशावेळी बॅंकांनी लहान शेतकरी, उत्पादक कंपन्या, बचत गट, सहकारी संस्था, खासगी पशू उद्योजक यांना आवश्यक ते अर्थसाह्य केले पाहिजेत. शिवाय यासंबंधीची पूर्ण प्रक्रिया ही जलद, सोपी असायला हवी. विशेष म्हणजे यासाठी पशुसंवर्धन विभागाबरोबर बॅंकांनी सुद्धा पशुपालकांत जाणीव जागृती निर्माण केली पाहिजेत. योजनेअंतर्गत पशुपालक अथवा शेतकऱ्यांना अर्थसाह्य करताना सर्व बॅंकांमध्ये एकवाक्यता हवी. त्यांच्यामध्ये नियम निकषांत संभ्रम नको.

राज्याचा विचार करता विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या जिरायती भागात पशुपालन आधारित उद्योग व्यवसाय उभारणीस ही एक चांगली संधी आहे. केंद्र-राज्य सरकारने सुद्धा पशुपालन योजनांच्या अनुषंगाने या भागात पायाभूत सुविधांपासून ते उद्योजक घडविण्यासाठी गुंतवणूक करायला हवी. या भागांच्या ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी शेतीनंतर पशुपालन हा एक पर्याय सध्या तरी दिसतो.

पशुपालनात केवळ उद्योजक घडवूनही चालणार नाही, तर त्यांना लागणारी सर्व सपोर्ट सिस्टिमही विकसित करायला हवी. अशा सपोर्ट सिस्टिममध्ये प्रामुख्याने चारा, पशुखाद्य, पशुपक्ष्यांचे लसीकरण, त्यांना लागणारे औषधोपचार, पशुवैद्यक यांचा समावेश होतो. राज्याचा विचार करता या सर्व सोयी सुविधा पातळ्यांवर आपली खूप पिछाडी दिसून येते. हे झाले नाही तर केवळ अर्थसाह्य करून पशुपालनात उद्योग-व्यवसाय उभे राहणार नाहीत, राहिले तरी ते फार काळ टिकणार नाहीत.

उमेद अभियानात पशुसखी तयार केल्या. परंतु त्यांना पुढे काही कार्यक्रम दिला नाही. तसे पशुपालनातील उद्योजकांचे होणार नाही, ही काळजी घ्यावी लागेल. पशुपालनात उद्योजक घडविण्यासाठी दूध, मांस, अंडी, लोकर यांची सुनियोजित विक्री व्यवस्था निर्माण करावी लागेल, शिवाय त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहायला हवेत, प्रक्रियायुक्त उत्पादने जगाच्या बाजारात पोहोचली पाहिजेत, तेव्हाच हे उद्योग शाश्‍वत होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Water Stock: खानदेशात जलसाठा घटू लागला

Loan Misuse: कर्जाचा गैरवापर; कारखान्यांवर कारवाई

Development Model: नाशिक जिल्ह्यात सामाजिक दायित्वावर आधारित विकासाला चालना

Rabi Irrigation Planning: कालवा दुरुस्तीसाठी पाणीवापर संस्थांना प्राधान्य

Fruit Orchard Cultivation: नांदेड जिल्ह्यात २५४ हेक्टरवर फळबाग लागवड पूर्ण

SCROLL FOR NEXT