Animal Husbandry : भारतातील विविध समुदायांच्या पारंपारिक पशुपालन संस्कृतीचे भव्य चित्र

Indigenous Breed : भारतातील पशुपालक व पशुधन यांचे विश्‍व खूपच वैविध्यपूर्ण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बनिहार, दोधी, गुज्जर व बकरवाल हे पशुपालक आढळतात. लडाखमध्ये अति उंचीवर हिम वाळवंटात चांगपा, हिमाचल प्रदेशात गद्दी व किन्नौरा, उत्तराखंडमध्ये वन गुज्जर तर उत्तरांचलमध्ये बोटीया हे पशुपालक आढळतात.
Animal Husbandry
Animal Husbandry Agrowon
Published on
Updated on

विजय सांबरे

Livestock Diversity :

समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पशुधन

भारतातील पशुपालक व पशुधन यांचे विश्‍व खूपच वैविध्यपूर्ण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बनिहार, दोधी, गुज्जर व बकरवाल हे पशुपालक आढळतात. लडाखमध्ये अति उंचीवर हिम वाळवंटात चांगपा, हिमाचल प्रदेशात गद्दी व किन्नौरा, उत्तराखंडमध्ये वन गुज्जर तर उत्तरांचलमध्ये बोटीया हे पशुपालक आढळतात.

रायका व रबारी राजस्थानमध्ये तर गुजरातमध्ये जाट, रबारी, समस, भरवाड, चरण व उंट मालधारी वास्तव्य करतात. महाराष्ट्रात धनगर, तेलंगणात कुरुमा, कर्नाटक राज्यात कुरुबा व गोल्ला, तसेच तमिळनाडूमधील निलगिरी पर्वतात तोडा हे पशुपालक राहतात. तिबेटच्या पठारावरील हिमालयातील लदाखमधील चौदा हजारांहून अधिक फटू उंचीवरील चांगथांग प्रांतापासून ते निलगिरी पर्वत व दख्खनच्या विस्तीर्ण पठारावरील पशुपालक संस्कृती समजून घेण्यासारखी आहे.

Animal Husbandry
Livestock Management : जनावरांमध्ये आढळणाऱ्या अनिष्ट सवयींवर उपाय

जम्मू- काश्मीर, लदाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या ऐन हिमालय पर्वताच्या कुशीत असणाऱ्या राज्यात प्रामुख्याने याक, चुरू, झोंग व पश्मीना शेळ्या, स्पितीयन घोडा इत्यादींचे पालन होते. पिढ्यान् पिढ्या दरवर्षी उन्हाळ्यात एप्रिल-मे महिन्यात हे भटके पशुपालक ठरलेल्या जागी चराईसाठी कमी उंचीच्या परिसरातून अति उंचीच्या (समुद्र सपाटीपासून चौदा हजार फूट उंच) प्रदेशात स्थलांतर करतात व ऑक्टोबरमध्ये बर्फ पडण्यापूर्वी माघारी परतात. हिमालयापाठोपाठ थरच्या वाळवंटातील राजस्थान-गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पशुपालक आहेत.

उंट, गाढव, गाई, बकऱ्या व मेंढ्यापालन करणारे समुदाय दरवर्षी मध्यप्रदेश, महाराष्ट्र ते तेलंगण राज्यात असे लांब पल्ल्याचे स्थलांतर करतात. भारतीय उपखंडातील अन्य राज्यांत पण मोठ्या संख्येने भटके व स्थिर पशुपालक आढळतात. ओडिशा राज्यात प्रामुख्याने आदिवासी व दलित समुदाय वराहपालन करतात.

शेजारच्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, पूर्व विदर्भात माडिया व इतर आदिवासी वराहपालन करतात. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात दख्खनच्या पठारावर शेळ्या, मेंढ्यापालक धनगर समाज हा भटका पशुपालक म्हणून प्रसिद्ध आहे. पश्‍चिम घाटात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकमधील आदिवासी महादेव कोळी, ठाकर, तसेच तलवार कांदडी व गवळी धनगर हे डांगी गाई, म्हशी पाळतात व जोडीला शेळ्या पण.

Animal Husbandry
Livestock Management : जनावरांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन

संपूर्ण देशाचा विचार केला तर गोवंशाचे चाळीस प्रकार, दहा प्रकारच्या म्हशी, सात प्रकारच्या मेंढ्या, एकोणावीस प्रकारच्या शेळ्या, तसेच तीन प्रकारची गाढवे, अकरा प्रकारचे घोडे पाळले जातात. अशा या गावरान पशुजनुकांची विविधता देशभरातील साठपेक्षा अधिक पशुपालक समाजामुळे आजही टिकून आहे.

देशातील साधारण ७३ टक्के भाग हा कोरडवाहू आहे. विविध समुदायांनी आपली पारंपारिक पशुपालन व्यवस्था उपजीविका व अन्नसुरक्षेच्या अंगाने याच कोरडवाहू भूभागात विकसित केली आहे. त्यांनी विकसित करून पाळलेले पशू हे विपरीत वातावरणात टिकू शकतात व लांब पल्ल्याचे स्थलांतर पण करू शकतात. त्यामुळे ७० टक्के गायवर्गीय, ६० टक्के म्हैसवर्गीय, ८० टक्के शेळ्या-मेंढ्या व डुक्करे व जवळपास ९८ टक्के देशी कोंबड्या या कोरडवाहू पशुपालन करणाऱ्या लोकसमूहांकडे आहेत.

बर्फाच्छादित हिमालयापासून ते दक्षिणेकडील निलगिरी पर्वतराजीपर्यंत, कोकण किनारा व सह्याद्रीपासून ते बांगला देश हद्दीपर्यंत, दख्खनच्या पठारापासून ते गंगेच्या विस्तीर्ण सपाटी प्रदेशपर्यंत, गुजरात-राजस्थानच्या बर्फाच्छादित हिमालयापासून ते दक्षिणेकडील निलगिरी पर्वतराजीपर्यंत, कोकण किनारा व सह्याद्रीपासून ते बांगला देश हद्दीपर्यंत, दख्खनच्या पठारापासून ते गंगेच्या विस्तीर्ण सपाटी प्रदेशपर्यंत, गुजरात-राजस्थानच्या वालुकामय भागापासून ते पूर्व घाटातील रायल सीमा प्रांतापर्यंतची शेती संस्कृती व व्यवस्था न्याहाळली तर पशुधनाची एक समृद्ध अशी जैवविविधता दृष्टीस पडते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com