Tanker Water Supply Agrowon
मुख्य बातम्या

Water Tanker : खानदेशात पाणीटंचाई, टॅंकरची मागणी वाढली

Khandesh Water Crisis : जळगावच्या पश्‍चिम भागात सिंचन प्रकल्प कोरडे आहेत. धुळ्यातही पांझरा, अनेर वगळता इतर प्रकल्पांत जलसाठा घटत आहे. नंदुरबारातही दरा व देहली हे प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांत ठणठणाट आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पाणीटंचाई वाढत असून, टँकरची संख्या ३० वर पोहोचली आहे. एकट्या चाळीसगाव तालुक्यात (जि. जळगाव) ११ टँकर सुरू आहेत. टंचाईस्थिती गंभीर बनत आहे.

जळगावच्या पश्‍चिम भागात सिंचन प्रकल्प कोरडे आहेत. धुळ्यातही पांझरा, अनेर वगळता इतर प्रकल्पांत जलसाठा घटत आहे. नंदुरबारातही दरा व देहली हे प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांत ठणठणाट आहे. खानदेशात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर येथील विविध तहसील कार्यालयांत आढावा घेण्यात येत आहे. यंत्रणा कार्यवाही करीत आहे. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांकडून टंचाई निवारणार्थ माहिती घेऊन विविध यंत्रणा सज्ज ठेवण्यासंदर्भात प्रशासनाला नुकतेच सर्व पालकमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

जळगाव जिल्ह्यात २१, धुळ्यात सात आणि नंदुरबारात सुमारे पाच टँकर सुरू असल्याची माहिती मिळाली. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात ११ टँकर सुरू आहेत. भडगाव, पारोळा, अमळनेर व जामनेरातही टँकर सुरू आहेत. नंदुरबारात नंदुरबार, नवापूर, धुळ्यात साक्री, धुळे, शिंदखेडा येथे टँकर सुरू आहेत. धुळ्यात पांझरा प्रकल्प भरला आहे. त्याद्वारे पांझरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. परंतु टंचाई दूर करण्यासाठी नदीतील पाणी प्रवाह पुरेसा नाही. नंदुरबार तालुक्यातही दुष्काळी स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात पश्‍चिमेकडील मन्याड, भोकरबारी, बोरी, अंजनी, बहुळा, अग्नावती, तोंडापूर, धुळ्यात मालनगाव, अमरावती, बुराई, सोनवद, नंदुरबारात सुसरी या प्रकल्पांत कमी जलसाठा आहे. हतनूर धरणात ७० टक्के, वाघूर प्रकल्पात ५७ टक्के आणि गिरणा धरणात ३६ टक्के जलसाठा आहे. चाळीसगावात बारा प्रकल्प कोरडेठाक आहेत. पिकांचीही परिस्थिती नाजूक आहे.

  चाळीसगावात ५० टक्के उत्पादन घटणार

कृषी अधिकारी किशोर हडपे यांनी पीकविमासंदर्भात माहिती देताना चाळीसगाव तालुक्यातील सात मंडलांत पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड पाहता उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट येण्याची शक्यता वर्तविली. तालुक्यात एकूण ५७ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला आहे. या संदर्भात ग्रामविकास अधिकारी व कृषी सहायकांमार्फत सर्व्हेक्षण करण्याचे ठरले. प्रतिपीक १० सर्व्हेक्षण करून त्यानुसार शेतकऱ्यांना २५ टक्के विमा संरक्षण देण्याबाबत शिफारस करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT