Sharad Pawar, Ajit Pawar Agrowon
मुख्य बातम्या

NCP Crisis : राष्ट्रवादी कोणाची?, समर्थक आमदार आणि खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांसाठी लगबग

Sharad Pawar NCP : तीन दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. त्यानंतर आज मुंबई शरद पवार यांच्या गटाकडून वायबी सेंटर, तर अजित पवार यांच्या गटाकडून एमईटी इन्स्टिट्यूटमध्ये बैठक बोलवण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या बैठकीला जायचे याबाबत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Team Agrowon

Ajit Pawar NCP : राष्ट्रवादीमध्ये बंड करत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर पक्षामधील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले असून आज दोन्ही गटांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तद्पूर्वी समर्थक आमदार आणि खासदारांकडून प्रतिक्षापत्र घेतले आहे. मात्र, राज्यभरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत शरद पवार की अजित पवार, अशी द्विधावस्था कायम आहे.

अजित पवार यांनी रविवारी (२ जून ) दुपारी सर्वांनाच धक्का देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर त्यांच्यासोबत आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी भाजप विरोधात मैदानात उतरून लढाईची तयारी दाखवली . त्यानंतर त्यांनी कऱ्हाड येथील प्रितीसंगमावरील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावर अभिवादन करून नवीन लढाईला सुरुवात केली.

या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून समर्थक आमदार आणि खासदारांची जुळवाजुळव सुरू झाली. अजित पवार यांच्याकडून सकाळी ११ वाजता एमईटी इन्स्टिट्यूटमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. तर शरद पवार यांच्या गटाकडून यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत कोण आणि शरद पवार यांच्यासोबत कोण? याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

या सत्तानाट्यानंतर दोन्ही गटाकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अजित पवार की शरद पवारांसोबत असल्याबाबतची प्रतिज्ञापत्रे घेतली जात आहेत. सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते बैठकीसाठी पदाधिकारी रवाना झाले आहेत. आता दोन्ही बैठकींपैकी कोण कोणत्या बैठकीत दिसणार, यावर राष्ट्रवादी कोणाची?, हे स्पष्ट होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT