NCP Crisis : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील यांची हकालपट्टी, सुनील तटकरेंची निवड, प्रफुल्ल पटेलांची घोषणा

NCP Ajit Pawar : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जागी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.
ajit pawar press conference
ajit pawar press conferenceagrowon
Published on
Updated on

NCP Political Crisis : एक वर्षांपूर्वी शिवसेनेतील बंडनंतर निर्माण झालेला सत्तासंघर्षाचा दुसरा अंक आता राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये सुरु झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे महासचिव सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई केली. तसेच अजित पवार यांच्यासह ९ आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली. तर अजित पवार गटाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची हकालपट्टी केली. त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर करण्यात आले.

ajit pawar press conference
Ajit Pawar : अजित पवार यांचे बंड

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण याच्या प्रीतीसंगम येथील समाधीचे दर्शन घेतले. ते अजित पवार गटाच्या विरोधात मैदानात उतरले आहे.

ajit pawar press conference
Sharad Pawar : विरोधी पक्षनेते पदावर काॅंग्रेसचा हक्क रास्त ; शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करणार

शरद पवार यांचा गट अॅक्शन मोडवर आला असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ९ जणांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती. तसेच विधीमंडळ पक्षप्रतोद पदी जितेंद्र आव्हाड यांची निवड केली होती. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्यावतीने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केल्यानंतर शरद पवार यांनी तात्काळ कारवाई केली.

दुसरीकडे अजित पवार गटाच्यावतीने अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत आहेत. राष्ट्रवादीमधील बहुसंख्य आमदार आमच्यासोबत असून पक्ष कार्यकारिणीने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधान सभा अध्यक्षांकडे केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांची हकालपट्टी करीत प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती केली. युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांनी निवड करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com