Irai Dam  Agrowon
मुख्य बातम्या

Irai Dam : इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले ;चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती; प्रशासन अलर्ट मोडवर

Chandrapur Flood : चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पाऊसाला सुरुवात झाली आहे. सततच्या पावसामुळे इरई धरण ८७ टक्के भरले असून धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Heavy Rain in Chandrapur : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे इरई धरणाची पाणीपातळी कमालीचा वाढ झाली असून शुक्रवारी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे इरई नदीतील पाण्याची पातळी वाढून चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसाने चंद्रपूरसह जिल्ह्यातील बहुतांश भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चंद्रपूर शहरालगतचे इरई धरण ८७ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे ७ पैकी २ दरवाजे उघडले. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात ८-१० फूट पाणी साचले आहे. या पुरामुळे अनेक नागरिक घरांमध्ये अडकले. त्यांना प्रशासनाच्यावतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. पुढील दोन दिवस असाच पाऊस राहिल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चंद्रपूरमधील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. तसेच वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. चंद्रपूर शहराजवळील इरई आणि झरपट नद्यांच्या पाणीपातळी वाढल्यामुळे गावात पाणी शिरले आहे. राजनगर आणि सहारा पार्क भागात शिरले इरई नदीचे पाणी आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture AI : ‘एआय’द्वारे घडेल सदाहरित कृषिक्रांती

Lumpy Vaccine : ‘लम्पी’ लस ठरणार मैलाचा दगड

Mango Cashew Insurance : तीनशे आंबा-काजू बागायदार विमा परताव्यापासून वंचित

Padalse Irrigation Project : पाडळसे निम्न तापी सिंचन प्रकल्प रखडलेलाच

Sugar market : महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशच्या साखर कोट्यात कपात

SCROLL FOR NEXT