Rashtrawadi Crisis : अजित पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात बंड करत राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. दरम्यान, आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन शरद पवार आपली ताकद दाखवणार आहेत. या बैठकीला देशभरातील राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानातून रवाना झाले आहेत.
राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दिग्गज नेत्यांनी बंड केले. राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले. यामध्ये अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. दरम्यान, दोन्ही गटाकडून आमदार आणि खासदारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. काल मुंबईत दोन वेगवेगळ्या बैठक झाल्या. अजित पवार गटाच्या बैठकीला राष्ट्रवादीचे 53 पैकी 32 आमदार उपस्थित होते, तर शरद पवार यांच्या बैठकीला केवळ 16 आमदार उपस्थित होते.यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.
दरम्यान, अजित पवार गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा सांगण्यात आला. तसेच दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर अजित पवार यांची निवड करण्यात आल्याची याचिका निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे राज्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष सुरू झाला असताना देश पातळीवर पक्षाच्या नेत्यांना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व पक्षप्रमुख आणि राज्याचे नेते जमण्याची शक्यता आहे. या बैठकीच्या माध्यमातून पवार पक्षातील नेत्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. पक्ष आणि चिन्हावरील आपला हक्क गमावू नये यासाठी शरद पवार यांचे हे आवश्यक पाऊल मानले जाऊ शकते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.