Sharad Pawar  Agrowon
मुख्य बातम्या

Sharad Pawar: ना टायर्ड हूं, ना रिटायर्ड... ; शरद पवारांचा पलटवार

NCP Crisis Live : राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार गटाने पक्ष आणि चिन्हावरच दावा केला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिला होता. यावर आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

Team Agrowon

Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. तसेच अजित पवार यांच्यावर हल्ला चढवत तुमचे वय झाले आहे. कधी थांबणार आहात की नाही? , असा सवाल केला होता. त्याला आज शरद पवार यांनी प्रतित्तुर दिले.

पक्षफुटीनंतर शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली. आज ते नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी यावेळी पवारांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दांचा पुनरुच्चार करत पवार म्हणाले, 'मला निवृत्त व्हायला सांगणारे ते कोण आहेत? मी अजूनही काम करू शकतो. " ना टायर्ड हूं, ना रिटायर्ड... असे म्हटले. त्यानंतर शेजारी बसलेल्या अमोल कोल्हेंनी डायलाॅग पूर्ण करत 'मै फायर हू' म्हटल्यावर पवार खळळून हसले"

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील नेत्यांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेऊन सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर बुधवारी शरद पवार आणि अजित पवार गटाकडून दोन वेगवेगळ्या बैठका घेण्यात आल्या होत्या. या बैठकीत अजित पवार म्हणाले, ``शरद पवार माझे दैवत आहेत. परंतु आता तुमचं ८२ वर्षांचं वय झालंय. तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? तुम्ही आता आराम करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या', अशा शब्दांत शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल चढवला.

यावेळी शऱद पवार यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या आरोपांचे खंडन करत भाजपवर हल्ला चढवला. पक्षाध्यक्षपदी माझी नियुक्ती बेकायदेशीर असेल, तर प्रफुल्ल पटेल आणि इतरांनी केलेल्या सर्व नियुक्त्या पूर्णपणे बेकायदेशीर आहेत, असेही शरद पवार म्हणाले. कारण अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल यांनीच माझ्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. दिल्लीत एकमताने निवड झाली.

शरद पवार यांनी महाराष्ट्र दौऱ्याला नाशिकपासून का सुरुवात केली. याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. नाशिक जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून काॅंग्रेस पक्षाला साथ दिली. आमचे सर्वांचे आदर्श यशवंतराव चव्हाण यांना जेव्हा पंतप्रधान पंडित नेहरूंनी बोलावले होते. तेव्हा चव्हाण साहेबांचा लोकसभेला पहिला प्रवेश नाशिकमधून झाला. नाशिककरांनी बिनविरोध त्यांना संसदेत पाठवले. १९८० मी काॅंग्रेसमधून बाहेर पडून पक्ष स्थापन केला. तेव्हा जिल्ह्यातील सर्व जागा आमच्या पक्षाच्या निवडून आल्या. या जिल्ह्याने नेहमीच आमच्या विचारांना साथ दिली आहे. त्यामुळे आपल्या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT