Ajit Pawar Vs Sharad Pawar : पक्षात निवडणूकाच झाल्या नाहीत ; प्रफुल्ल पटेल यांचा दावा

Todays NCP Meeting : राष्ट्रवादीतील पक्षफुटीनंतर गुरुवारी शरद पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्ष संघटनेबद्दल धक्कादायक खुलासा केला.
Ajit Pawar group
Ajit Pawar groupagrowon
Published on
Updated on

Praful Patel Rashtrawadi Crisis : राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार गटाकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. "पक्षामध्ये कोणतीही नियुक्ती ही पक्षांतर्गत निवडणुकीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होत्या. पण आमच्याकडे कधीच निवडणुका झालं नाही, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला.

Ajit Pawar group
Sharad Pawar : राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार महाराष्ट्रभर फिरणार; असा असणार दौरा?

राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह बहुसंख्य आमदारांनी अजित पवार यांना आपला नेता मानला. दरम्यान, शरद पवार यांनी गुरुवारी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. यामध्ये अनेक राज्यांच्या प्रमुखांना पाठिंबा असल्याचा दावा केला होता.

Ajit Pawar group
NCP Crisis : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील यांची हकालपट्टी, सुनील तटकरेंची निवड, प्रफुल्ल पटेलांची घोषणा

शरद पवार यांच्या गटाच्या दाव्यांना प्रतित्तुर देण्यासाठी आज अजित पवार गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि महत्वाचे नेते उपस्थित होते. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी दि. ३० जूनपासून पक्षांतर्गत झालेला घटनाक्रम सांगितला.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, 30 जून रोजी अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी पक्षाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये सर्वानुमते अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली. त्याबाबतची याचिका केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे.

तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजित पवार, पक्षप्रतोद म्हणून अनिल पाटील यांना प्रतोद म्हणून नियुक्ती करण्याची तसेच विधान परिषदेच्या प्रतोदपदी अमोल मिटकर यांची निवड करण्याबाबतचे पत्र विधान परिषद उपसभापतींना दिले होते.

आम्हाला पक्षातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत. त्यामुळे पक्ष चिन्ह आम्हाला मिळाले पाहिजे, अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली. काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. ती अधिकृत बैठक नव्हती.

आमच्या पक्षाच्या घटनेत काही नियम आहेत. या नियमानुसार प्रक्रिया चालली पाहिजे होती. महाराष्ट्रात कधीच निवडणुका झाल्या नाहीत, तर इतर ठिकाणचा विषयच येत नाही. मी माझ्या सहीने राष्ट्रीय पातळीवर अनेक नियुक्त्या केल्या आहे, त्या सगळ्या बेकायदेशीर आहेत," असे पटेल म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com