Swabhimani Morcha Agrowon
मुख्य बातम्या

Sugarcane FRP : गत हंगामातील ४०० रुपये न दिल्यास साखर अडवू : राजू शेट्टींचा ‘अल्टिमेटम’

Swabhimani Shetkari Sanghatana : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांकडून मागील हंगामातील उसाला ४०० रुपये मिळावेत, यासह कारखान्यांनी ऑनलाइन काटे बसवावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बुधवारी (ता. १३) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Team Agrowon

Raju Shetty News : ‘‘गेल्या हंगामात तुटलेल्या उसाचे ४०० रुपये कारखान्यांनी २ ऑक्टोबरपर्यंत न दिल्यास कारखान्यांची साखर वाहतूक अडवू. याच वेळी प्रत्येक कारखान्यासमोर ढोल वाजवून त्यांना जागे करण्यात जाईल,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. ‘‘ऊस उत्पादकांचा हक्काचा दर मिळवून देण्यासाठी इथून पुढे आंदोलन तीव्र करणार आहे. दोन ऑक्टोबरनंतर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल,’’ असे शेट्टी यांनी सांगितले.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांनी मागील हंगामातील उसाला ४०० रुपये मिळावेत, यासह कारखान्यांनी ऑनलाइन काटे बसवावेत, अन्यथा त्यांना गाळप परवाने देऊ नयेत, या मागणीसाठी बुधवारी (ता. १३) येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला.

शेट्टी म्हणाले, ‘‘साखर कारखान्यांना गेल्या हंगामात गाळप झालेल्या साखरेस व उपपदार्थास चांगले दर मिळाले आहेत. यामुळे कारखान्यांकडे एफआरपी अदा करून तोडणी वाहतूक व प्रक्रिया खर्च वजा जाता अजूनही पैसे शिल्लक राहिले आहेत. पुणे जिल्ह्यातील सोमेश्‍वर माळेगाव साखर कारखान्याने जवळपास प्रतिटन ५०० रुपयांहून अधिकचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. वास्तविक पाहता सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखान्यांची रिकव्हरी पुणे जिल्ह्यातील कारखान्यांपेक्षा जादा आहे. यामुळे सांगली व कोल्हापुरातील कारखान्यांना दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये देणे सहज शक्य आहे. हे पैसे आम्ही सोडणार नाही.’’

‘‘भविष्यातही उसापासून तयार होणाऱ्या साखरेला व उपपदार्थांना भविष्यात चांगले उत्पन्न मिळेल. वाढलेली महागाई, गगनाला भिडलेले औषधे, बी-बियाणे व खताचे दर यामुळे उत्पादन खर्चात बेहिशेबी वाढ झालेली आहे. यामुळे ऊस उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन व डिजिटल होत नाहीत. तोपर्यंत साखर कारखान्यास गाळप परवाना देऊ नये. या मागण्यांवर तातडीने योग्य कार्यवाही करावी. या धडक मोर्चाची दखल घ्यावी, अन्यथा राज्यभर आंदोलनाचा भडका उडेल,’’ असा इशारा शेट्टी यांनी दिला. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, अजित पोवार, राजेंद्र गड्यानवार, राम शिंदे आदींसह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘ऊसतोडणीस गडबड करू नका’

प्रभारी प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी दोन्ही जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल करण्याची प्रक्रिया वेगात असल्याचे सांगितले. ‘‘केवळ चारच कारखान्यांचे काटे अजून डिजिटल व्हायचे आहेत. ते ही या हंगामात पूर्ण होतील,’’ अशी माहिती त्यांनी दिली. ‘‘यंदा ऊस तोडायला पैसे द्यायचे नाहीत, या बाबतचे ठराव गावांनी करावेत. यंदा तीन महिन्यांत लावण ते निडवा सर्व ऊस जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ऊसतोडणीस गडबड करू नये,’’ असे आवाहनही मावळे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT