Tourism Subsidy : अहिल्यानगर हा कृषिप्रधान जिल्हा असल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर समितीने विशेष भर दिला. पात्र शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे की नाही, याची नियमित पडताळणी करावी. तसेच योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी, अशा सूचना देण्यात आल्या. कृषी क्षेत्राला पर्यटनाची जोड देऊन ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रांची निर्मिती करण्याची सूचना समितीने केली..महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीने ६ ते ८ ऑगस्टदरम्यान जिल्ह्याचा दौरा करत विविध विकासकामे, प्रकल्प आणि शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेतला. विधानसभा सदस्य तथा समिती प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या दौऱ्यात समितीने विविध विभागांच्या आढावा बैठका घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या..Agricultural Engineering: ‘कृषी अभियांत्रिकी’तून साधता येईल करिअर.जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. समिती सदस्य काशिराम पावरा, कृष्णा खोपडे, बालाजी कल्याणकर, शेखर निकम, डॉ. राहुल पाटील, कैलास पाटील, सदाशिव खोत, हेमंत पाटील, सतीश चव्हाण, मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी आणि नमिता मुंदडा यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त यशवंत डांगे, विधानमंडळ सचिवालयाच्या अवर सचिव सीमा तांबे, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते..Pandharpur Development Plan: पंढरपूर विकास आराखड्यासह कॉरिडॉरच्या कामांना गती द्या : मुख्य सचिव राजेश अग्रवाल.अंदाज समितीने जिल्ह्यातील विविध विभागाअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना आणि विकासकामांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची सद्यःस्थिती, प्रगती, खर्च, अंमलबजावणीतील अडचणी, तसेच अपेक्षित परिणाम या बाबत माहिती घेण्यात आली. विकासकामांची गुणवत्ता आणि निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने समितीने आवश्यक त्या सूचना केल्या. जिल्ह्यातील विकासाचा वेग वाढविताना उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रभावी वापर, जलव्यवस्थापन, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी वाढविणे आवश्यक आहे..गौणखनिज, जलजीवनवर चर्चा नाहीअहिल्यानगर तालुक्यातील वारूळवाडी व कापूरवाडी शिवारात पाहणी केलेल्या व अवैध गौणखजिक उत्खनन करत असल्याचे सांगत समिती संतप्त झाली. अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन योजनेच्या कामात मोठा गैरव्यवहार झाला. त्यावरही समिती भाष्य करेल, असे वाटत होते. मात्र शेवटच्या दिवशी समितीने गौणखनिज अवैध उत्खनन व जलजीवन योजनांच्या गैरव्यहाराबाबत भाष्य केले नाही. त्यावर चर्चा ही झाली नसल्याचे कळते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.