Rabi Crop
Rabi Crop Agrowon
मुख्य बातम्या

Rabi Sowing : दोन लाख हेक्टरवर होणार रब्बी पिकांची लागवड

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : खरीप हंगाम (Khareef Season)अंतिम टप्प्यात असताना कृषी विभागाकडून आता रब्बी हंगामाची (Rabi Season) नियोजन केले जात आहे. यंदा दोन लाख हेक्टरवर रब्बी लागवड क्षेत्र राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याकरिता १,२३,३६७८ क्विंटल बियाणे लागण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने (Agricultural Seed) सांगितले.

खरीप हंगामात संततधार पावसाने पिकाची दाणादाण उडवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आता रब्बी हंगामांकडून लागून आहेत. यंदाच्या हंगामात १.४० लाख हेक्टरमध्ये हरभरा व पाच हजार हेक्टरमध्ये गहू राहण्याची शक्यता आहे. पाच हजार हेक्टर मका व ५५० हेक्टरमध्ये ज्वारी लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

त्याकरिता ३६,५२२ क्विंटल बियाणे सार्वजनिक क्षेत्रातून उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ५५.३४२ क्विंटल बियाणे खासगी व महाबीज द्वारे ३१,५१४ बियाण्यांचा पुरवठा होणार आहे. यामध्ये ऑक्टोबर महिन्यात १९ हजार ४५० मॅट्रिक टन, नोव्हेंबर महिन्यात २१८००, डिसेंबर २२७५, जानेवारी २४ हजार २२०, फेब्रुवारी १५७०० व मार्च महिन्यात ११ हजार ७१७ टन खताचा पुरवठा होणार आहे.

ज्वारी लागवडीला प्रोत्साहन

धान्य आणि चाऱ्याची उपलब्धता व्हावी याकरिता कृषी विभागाच्या वतीने यंदाच्या आरोग्य हंगामात ज्वारी लागवडीला प्रोत्साहन देण्याचे प्रस्तावित आहे. किमान १००० हेक्टरपर्यंत तरी हे क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न केला जात आहे.

त्याकरिता शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चात यांनी दिली. यंदा हरभऱ्याचे व गव्हाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. संततधार पावसामुळे जमिनीत आर्र्द्रता असल्याने त्याचा पिकाच्या पोषक वाढीसाठी फायदा होणार असल्याचे देखील सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : हळदीच्या भावातील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, हळद तसेच आल्याचे दर ?

Jowar Registration : ज्वारी विक्रीसाठी शासकीय केंद्रात अल्प नोंदणी

Agriculture Fertilizer : जळगावात मुबलक खतांसाठी कृषी विभागाची दमछाक

Mahabeej Workshop : कानशिवणी येथे ‘महाबीज’ची शेती कार्यशाळा

Maharashtra Rain : विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT