Maharashtra Assembly  Agrowon
मुख्य बातम्या

Assembly Monsoon Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होणार

Maharashtra Assembly Session 2023 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या नियोजनाची बैठक झाली, या बैठकीत १७ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

Team Agrowon

Maharashtra Legislative Assembly Session 2023 : महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हे अधिवेशन मुंबईत 17 जुलैपासून सुरु होणार असून ते 14 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या अधिवेशनापूर्वी नुकत्याच शपथ घेतल्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर केले जाणार आहे.

विधीमंडळाचेच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासाठी सल्लागार समितीची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्याचं विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे होते. पण चार दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-फडणवीस सरकारामध्ये सहभागी झाले. त्यामुळे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते पद रिक्त आहे. सध्या विधीमंडळात काॅंग्रेसच्या आमदारांचे संख्या बळ जास्त असल्याने विरोधपक्ष नेते पद त्यांनाच मिळण्याची शक्यता आहे.

विधीमंडळ कामकाज समितीनंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नाराज होऊन ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे विधानपरिषदेतील शिवसेनेचे संख्याबळ घटले आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धोक्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT