March Heatwave Conditions 
मुख्य बातम्या

उष्णतेची लाट का आणि कशी येते?

येत्या चार दिवसांमध्ये राज्यातील ठराविक जिल्ह्यांमधील काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. आपल्या जिल्ह्याचे नावही या यादीत आहे का? तसेच ही उष्णतेची लाट नेमकी काय असते, ती कशी आणि का येते, जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून.

मयूर गिऱ्हे

पुणे : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या चार दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पण ही अतितिव्र उष्णतेची लाट (heatwave) नसून सामान्य नागरिकांना फारशी हानीकारक ठरेल, असे वातावरण नाही. असे असले तरी नवजात बालके आणि जुने आजार असलेल्या वयोवृद्ध नागरिकांनी मात्र काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात घराबाहेर निघणे टाळावे लागणार आहे. घराच्या बाहेर पडायची गरज पडलीच, तर हलक्या रंगाचे सूती ढगळ कपडे वापरून, डोके झाकून बाहेर पडावे, असा सल्ला हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Heat wave conditions very likely to prevail in isolated pockets of North Madhya Maharashtra and Marathwada from 30th March. येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा . तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्या pic.twitter.com/cu8e4zSzpM

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai)

हा अंदाज खरा ठरल्यास महाराष्ट्रात ऐन मार्चमध्येच दोनदा उष्णतेच्या लाटा येऊन जातील. कारण याआधी मार्चच्या मध्यात मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट येऊन गेली होती. परंतु हा हवामान बदलाचा परिणाम नसून या घटनेत अपवादात्मक असे काही नाही.

“राज्यात मार्चमध्ये उष्णतेची लाट येणे ही दुर्मिळ घटना नाही. यापूर्वीही विसाव्या शतकात मार्चमध्ये उष्णतेच्या लाटेच्या नोंदी सापडतात. फरक एवढाच आहे की आता दळणवळणाची आणि माहितीची साधने वाढल्याने या लाटांची माहिती लोकांना लवकर मिळते,”

- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, हवामानशास्त्र विभाग

उद्या येण्याची शक्यता असलेली लाट पूर्ण राज्यभर असणार नाही. विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यातील ठराविक जिल्ह्यांमधल्या काही ठिकाणीच (isolated pockets) हा परिणाम जाणवणार आहे.

  • उष्णतेच्या लाटेची शक्यता कधी आणि कुठे?
    1. २९ मार्च : अमरावती, अकोला, बुलढाणा
    2. ३० मार्च : अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर
    3. ३१ मार्च : अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर
    4. ०१ एप्रिल : परभणी, हिंगोली, जालना, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर

    रविवारी २७ मार्चला सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोल्यात देशातल्या उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे विदर्भात, त्यातल्या त्यात अकोला जिल्ह्यात उन्हाचा चटका चांगलाच जाणवणार, असे दिसते. उष्णतेची लाट जाहीर करताना खालील निकष लक्षात घेतले जातात.

    1. एखाद्या ठिकाणचे कमाल तापमान तेथील सरासरी कमाल तापमानापेक्षा कमीत कमी ४.४° सेल्सिअसने जास्त असावे लागते
    2. राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमान ४०° सेल्सिअसपेक्षा जास्त, तर किनारवर्ती भागात तापमान ३७° सेल्सिअस पेक्षा जास्त असावे लागते
    3. त्या भागातील किमान दोन हवामान केंद्रांनी ही परिस्थिती सलग दोन दिवस कायम असल्याचे नोंदवावे लागते

    हे तीनही निकष पूर्ण होत असतील, तरच त्या भागात उष्णतेची लाट आली, असे हवामानशास्त्र विभागाकडून (IMD) जाहीर करण्यात येते.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

    Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

    APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

    Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

    Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

    SCROLL FOR NEXT