Textile mill will get long term loan  Agrowon
मुख्य बातम्या

सूतगिरण्यांना मिळणार दीर्घ मुदतीचे कर्ज

मगासवर्गीयांच्या प्रस्तावित सहकारी सूतगिरण्यांची प्रकल्प किमतीच्या ५ टक्के आणि कमीतकमी ८० लाखापार्यंत सभासद भाग भांडवल गोळा केल्यास प्रत्येक गिरण्या कर्जाकरिता पात्र समजण्यात येतील.

Team Agrowon

योजनेचे नाव- अनुसूचित जातीच्या,मागासवर्गीय प्रवर्गातील सदस्यांच्या सहकारी सूतगिरण्यांना (textile mill) दीर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना

लाभार्थी- अनुसूचित जाती

लाभाचे स्वरूप- सुतगिरणी प्रकल्प मूल्याचे ५० टक्के कर्ज

आवश्यक कागदपत्रे-

· मगासवर्गीयांच्या प्रस्तावित सहकारी सूतगिरण्यांची प्रकल्प किमतीच्या ५ टक्के आणि कमीतकमी ८० लाखापार्यंत सभासद भाग भांडवल गोळा केल्यास प्रत्येक गिरण्या कर्जाकरिता पात्र समजण्यात येतील.

· शासनाच्या सहकार व वस्त्रोद्योग विभागाने १:९ या प्रमाणे त्यांचे शासकीय भागभांडवल वितरीत करावे. शासकीय भागभांडवल वितरीत झालेल्या गिरण्या योग्य प्रमाणात सामाजिक न्याय विभागाकडून (५० %) कर्ज मिळण्यास पात्र राहतील.

· सहकारी सूतगिरण्यांचा सादर करण्यात आलेला प्रकल्प अहवाल मुल्यांकित करण्याकरिता मुदत कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था किंवा बँका यांच्याव्यतिरिक्त खालील शासन पुरस्कृत संस्थापैकी एका संस्थेकडून तपासून/ मुल्यांकित करून घेऊन शासन मान्यतेसाठी सादर करावे.

मुल्यांकन कामाचे शुल्क रुपये २.५० लाख इतके निश्चित करण्यात येत आहेत. तसेच प्रकल्प मुल्यांकनाचा जो खर्च दर्शविला आहे.तो संबंधित गिरणीने उचलणे आवश्यक आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रीयल अँड टेक्निकल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन लिमिटेड (मिटकॉन) पुणे, ॲग्रीकल्चर फायनान्स कार्पोरेशन, मुंबई, दत्ताजीराव टेक्निकल इन्स्टिट्यूट, इचलकरंजी

संपर्क- संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे अर्ज करावा.

वेबसाईट- https://sjsa.maharashtra.gov.in

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT