Koyna protest Agrowon
मुख्य बातम्या

Koyna Protest : आकाशातला चंद्र नको, आम्हाला आमच्या हक्काचं तेवढं द्या; कोयना धरणग्रस्तांचं आमरण उपोषण

Shramik Mukti Dal Protest : कोयना, तारळी, वांग, उरमोडी, चांदोली या धरणग्रस्तांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी २ हजार धरणग्रस्तांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

Swapnil Shinde

Koyna Dam Affected Villagers Protest : कोयना धरणग्रस्तांचा ६५ वर्षांपासून पुनर्वसनाचा संघर्ष सुरू आहे. मात्र, अजूनही त्यांचं पुनर्वसन झालं नाही. त्यामुळे धरणग्रस्तांचा लढा निर्णायक टप्पावर आला असून धरणग्रस्तांनी २७ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयनानगर येथे कोयना, तारळी, वांग, उरमोडी, चांदोली या धरणग्रस्तांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी २ हजार धरणग्रस्तांनी आंदोलन सुरू केले आहे.

कोयना धरणग्रस्तांचा ६२ महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. अनेक आंदोलन केल्यानंतर शासनाने धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. कोयनेच्या १५०० हजार लोकांना अजून जमीन मिळाली नाही. आणि ४००० लोकांचं अंशत: पुनवर्सन झालं नाही. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री, २०२० मध्ये उपमुख्यमंत्र्यांनी पात्र खातेदारांची यादी तयार करण्याचे मान्य केले. धरणग्रस्तांनी जमिनींची पसंती झाल्या. मात्र, अजूनही जमीन वाटपाचे आदेश दिले नाही. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. मात्र, त्यानंतर अजूनही शासन आदेश निघाले नाहीत.

डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘‘धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अनेक बैठका झाल्या; मात्र, झालेल्या बैठकांच्या इतिवृत्तावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित विभागाचे प्रधान सचिव यांच्या सह्या झालेल्या नाहीत. बैठकांच्या इतिवृत्तावर सह्या होऊन आदेश काढले जावेत, यासाठी आम्ही बेमुदत उपोषणाचा इशारा शासनाला दिला होता. मात्र, धरणग्रस्तांच्या जीवापेक्षा खुर्ची महत्वाची आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT