
Satara News : शासन कोयना प्रकल्पग्रस्तांप्रती संवेदनशील व सकारात्मक असल्यामुळे मागील तीन महिन्यांत कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न वेगाने निकाली काढण्याप्रती असलेले उत्तरदायित्वाचे गांभीर्याने पालन करीत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
याबाबत पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी डॉ. भारत पाटणकर यांच्यासमवेत दि. १३ मे रोजी पाटण येथे समक्ष चर्चा करून या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देऊन उच्चाधिकार समितीस तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
कोयना प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थापन उच्चस्तरीय समन्वय समितीच्या मंत्रालय मुंबई येथे दोन बैठका माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्या होत्या. या बैठकांमध्ये प्राप्त अर्जावर तत्काळ कार्यवाही करण्याची सूचना दिली. तसेच सातारा जिल्ह्यातील उपलब्ध जमीन पसंती कार्यक्रम राबवून त्याप्रमाणे तत्काळ वाटप करण्याची सूचनाही केली.
३१८ प्रकल्पग्रस्तांनी सांगली येथे जमीन पसंत केली त्याची पडताळणीकामी प्रस्ताव सांगलीकडून सातारा कार्यालयास प्राप्त झाला. त्याबाबतची पडताळणी झालेली असून अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांना कळविण्यात आलेला आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण, दहिवडी व खटाव तालुक्यात श्रमिक मुक्ती दलाच्या मागणी प्रमाणे पसंती कार्यक्रम राबविला त्यानुसार मागील ३ दिवसांत ७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याबाबत महिन्याभरात कार्यवाही पूर्ण होईल व वाटप प्रकिया सुरळीत होईल.
आंदोलन करू नये, पालकमंत्र्यांचे आवाहन
शासन आपल्या स्तरावरून कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शक्य ते पाऊल उचलत असताना डॉ. भारत पाटणकर यांनी शासन करीत असलेल्या प्रयत्नांची वस्तुस्थिती प्रकल्पग्रस्तांना देऊन सहकार्य करावे व येत्या १९ जून रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलनाला स्थगिती द्यावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.