We only sell certified seeds 
मुख्य बातम्या

आम्ही फक्त प्रमाणित बियाणेच विकू : विक्रेता संघटना

बियाणे विक्रीपूर्वी त्याची कंपनी व लॉटनिहाय उगवण चाचणी करण्याबाबत कृषी विभागाने केलेल्या सूचनेला विरोध वाढत आहे. अकोला जिल्ह्यातील विक्रेत्यांच्या संघटनेने हंगामात केवळ प्रमाणित बियाणेच विकू असे कृषी विभागाला कळविले आहे.

टीम अॅग्रोवन

अकोला ः आगामी हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे विक्रीपूर्वी त्याची कंपनी व लॉटनिहाय उगवण चाचणी करण्याबाबत कृषी विभागाने केलेल्या सूचनेला विरोध वाढत आहे. अकोला जिल्ह्यातील विक्रेत्यांच्या संघटनेने हंगामात केवळ प्रमाणित बियाणेच विकू असे कृषी विभागाला कळविले आहे.

सोयाबीन बियाण्याची विक्रीपूर्व उगवण क्षमता चाचणीबाबत, वरिष्ठांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांच्या संघटनेला पत्र देत त्याबाबत सुचविले होते. या पत्राला अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने उत्तर दिले आहे. यात कंपनीनिहाय, लॉटनिहाय सोयाबीन बियाण्याची चाचणी कशी करावी, चाचणी करण्यासाठी सोयाबीन बियाण्याची बॅग एका लॉटची फोडल्यावर नंतर त्या बॅगचे काय करावे, सोयाबीन बियाण्याची फोडलेली बॅग बिलामध्ये शेतकऱ्याला विकणे हे कायद्याच्या चौकटीत बसते काय, असे प्रश्‍न विचारले आहेत. शिवाय एका विक्रेत्यांकडे कुठल्याही कंपनीच्या सोयाबीनच्या १०० बॅग येत असतील, तर त्या सरासरी तीन लॉट असतात. याप्रमाणे तीन लॉटच्या तीन बॅग नमुना घेण्यासाठी फोडाव्या लागतील. अशा साधारण पाच कंपन्यांचे बियाणे एका विक्रेत्याकडे येत असेल, तर १५ बॅग नमुन्यासाठी फोडाव्या लागतील.

जिल्ह्यात ६०० कृषी विक्रेते आहेत. प्रत्येकाने १५ बॅग फोडल्या तर ९००० बॅगची एकूण चाचणी होईल. त्यामुळे एवढे बियाणे वाया जाईल. या बॅगांमुळे ९००० एकराचे बियाणे पेरणीविना राहील, असे गणित मांडले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व विक्रेते २०२१-२२ च्या या हंगामात केवळ प्रमाणित बियाणे विकणार आहोत. प्रमाणित बियाणे हे शासनाने प्रमाणित केलेले असल्याने त्याची पूर्वउगवण चाचणी करणे आवश्‍यक राहील काय, याबाबतही कृषी खात्याने मार्गदर्शन करावे, असे कृषी विक्रेत्यांच्या संघाने पत्रात म्हटले.

प्रमाणितच बियाणे विकणार विक्रीपूर्व उगवणक्षमता चाचणी आदेशामुळे जिल्ह्यातील विक्रेत्यांनी फक्त प्रमाणित बियाणे विकणार असल्याचे जाहीर केले. कुठल्याही कंपनीचे नोटिफाइड वाणाचे ट्रुथफूल बियाणे विकणार नसल्याचे कृषी विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष मोहन सोनोने व सचिव सचिन राऊत यांनी कळविले आहे. जिल्हा संघाच्या पदाधिकाऱ्यांची ही भावना महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स सीडस डीलर्स असोसिएशनला (माफदा)पोहोचविली जाणार आहे. यानंतर माफदा प्रत्येक जिल्ह्याची भावना जाणून एकत्रितपणे कृषी खात्याला लवकरच आपला निर्णय कळविणार असल्याचेही श्री. सोनोने यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत मंजूर; परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपये वाटण्यास मान्यता

Wild Vegetable Festival : नैसर्गिक रानभाजी महोत्सवाने पेसा गावात निसर्गाचा सन्मान

Janjira Fort Jetty : जंजिरा जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच खुली होणार

Crop Damage Compensation : पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पावसाच्या मंडलात भरपाईचे प्रयत्न

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच

SCROLL FOR NEXT