Water quality can be checked in the village itself 
मुख्य बातम्या

पाण्याची गुणवत्ता गावातच तपासता येणार

पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आता गावातीलच पाणीपुरवठा समितीच्या प्रशिक्षित महिला फिल्ड टेस्ट किटद्वारे करू शकणार आहेत. पाण्याची गुणवत्ता गावस्तरावरच कळणार असल्याने पुढील उपाययोजना करता येतील, अशी माहिती जि

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षांतर्गत पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आता गावातीलच पाणीपुरवठा समितीच्या प्रशिक्षित महिला फिल्ड टेस्ट किटद्वारे करू शकणार आहेत. पाण्याची गुणवत्ता गावस्तरावरच कळणार असल्याने पुढील उपाययोजना करता येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिली. 

प्रत्येक ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा समितीच्या ५ महिलांना या बाबतचे प्रशिक्षण दिले जाणार असून, याची सुरुवात दोन दिवसांपूर्वी सागवन ग्रामपंचायतीपासून करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या पाणी गुणवत्ता कक्षामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला स्रोतनिहाय फिल्ड टेस्ट किटचा पुरवठा करण्यात येणार आहे. गावातील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यादृष्टीने वर्षातून दोन वेळेस पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी नियमितपणे होत असते. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण हे सुद्धा वर्षातून दोनदा होते. 

या बाबींची नोंद ही शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात येत असून, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता गावस्तरावरच कळावी या अनुषंगाने जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतीमध्ये ४३४५ महिलांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाद्वारे पिण्याच्या पाण्यातील जैविक घटक व रासायनिक घटक याचे प्रमाण स्थानिक पातळीवरच कळणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी १० निवडक जलसुरक्षक प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षक यांचे एकदिवसीय प्रशिक्षण या आधीच जिल्हास्तरावर घेण्यात आले. पुढील टप्प्यात गावातील पाणीपुरवठा स्वच्छता समितीमधील महिलांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंदनसिंग राजपूत यांचे मार्गदर्शनात सागवन ग्रामपंचायतीत याबाबत प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. 

प्रशिक्षणास पाणी गुणवत्ता कक्षातील जलनिरीक्षक शरद ठाकूर, पाणी गुणवत्ता सल्लागार किरण शेजोळे, मनुष्यबळ विकास सल्लागार मनीषा शेजव, ग्रामसचिव श्री. टेकाळे, जलसुरक्षक विजय सोनवणे व ग्रामस्थ हे उपस्थित होते. या वेळी गावातील ५ महिलांना प्रत्यक्ष फिल्ड टेस्ट किटद्वारे पाण्याची कशी तपासणी करावी, या बाबतचे प्रात्यक्षिक करून प्रशिक्षण देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Policy : इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळतो; केंद्रीय मंत्री जोशींचा दावा

Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांसाठी ५७४ कोटींची मागणी

Kunbi community wedding reforms : साध्या लग्नसोहळ्याचा कुणबी बांधवांकडून आदर्श

Agriculture : अमेरिकेचे फूड बास्केट असलेल्या ‘या’ राज्यासोबत महाराष्ट्राचा करार, कृषीसह विविध क्षेत्रात एकत्र काम करणार

Farmers Protest : उद्योगांच्या नावाखाली सुपीक जमिनींची नासाडी

SCROLL FOR NEXT