संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची पूरग्रस्त भागात पाहणी
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची पूरग्रस्त भागात पाहणी 
मुख्य बातम्या

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची पूरग्रस्त भागात पाहणी

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी बुधवारी (ता. १८) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाने केली. महापुरात उद्ध्वस्त झालेल्या पिकांबरोबर नुकसान झालेल्या अन्य घटकांबाबत प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली. सकाळी नऊ वाजल्यापासून कोल्हापूर शहर, इचलकरंजी, शिरोळ, कुरुंदवाड, राजापूर, आणि खिद्रापूर या गावांना भेटी देण्यात आल्या. शेती, पडलेली घरे आदिंसह नुकसान झालेल्या बाबींची पाहणी करण्यात आली. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी महापूर काळातील परिस्थितीची माहिती देऊन पिकांचे झालेले नुकसान अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. घरे पडलेले नागरिक, नुकसान झालेले उद्योजक यांच्याशी बोलत नुकसानीच्या तीव्रतेची माहिती घेतली. अनेक नागरिकांनी उपजीविकाच करणे अशक्‍य झाल्याचे सांगत भरीव मदतीची अपेक्षा व्यक्त केली.जिल्ह्यातील ३४५ गावे या महापुरात बाधित झाली. यामध्ये ९५४२ पूर्णत: घरांचे तर ३१४९२, अंशत: घरांचे नुकसान झाले आहे. ४२२१ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे ७८१०२ हेक्‍टर पिकांचे, तसेच ३३७ हेक्‍टर जमिनीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण २८२ रस्त्यांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शिष्टमंडळाला दिली.  कृष्णा, भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून पुराचे जादा वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त तालुक्‍यांना पोचविण्याचे नियोजित आहे. भविष्यामध्ये असा महापूर आल्यास त्यासाठी उपाय योजना म्हणून रस्त्यांची उंची वाढविणे, आवश्‍यक त्याठिकाणी उड्डाण पूल बांधणे, आवश्‍यक त्या ठिकाणी पुलांची निर्मिती करणे, महावितरणचे उपकेंद्र उंच ठिकाणावर बसविणे, विजेच्या खांबांची उंची वाढविणे अशा नियोजित कार्यक्रमाबाबत चर्चा केली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महापुरामुळे नुकसान झाले. शेतीबरोबर लघुउद्योगही बुडाले. अशा नागरिकांना उभारा देण्यासाठी तातडीने काय करता येईल याचा अंदाज शिष्टमंडळातील सदस्यांनी घेतला. सदस्यांनी पूरग्रस्त विविध घटकांशी संवाद साधला. याबाबतचा अहवाल तयार करून मदतीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले. पुनर्प्राप्ती सल्लागार डॉ. कृष्ण वत्स यांच्या नेतृत्वाखाली गृहनिर्माण तज्ज्ञ पी. के. दास, उपजीविका तज्ज्ञ हेमंत वाळवेकर आणि अविनाश कुमार यांचा या पथकात समावेश होता. तत्पूर्वी मंगळवारी सायंकाळी कोल्हापूर लगतच्या चिखली आंबेवाडी भागाची पहाणी करून ग्रामस्थांशी संवाद सांधला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांदा पुन्हा गडगडला

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

LokSabha Election : मावळात मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार?

Loksabha Election 2024 : अकरा मतदार संघांतील उमेदवारांचे भवितव्य ‘बंद’

PDKV Seed Research Centre : ‘पंदेकृवि’चे बियाणे संशोधन केंद्र ठरले राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट

SCROLL FOR NEXT