Swachh Bharat Abhiyan will be implemented in rural areas 
मुख्य बातम्या

स्वच्छ भारत अभियान ग्रामीण भागात राबविणार

राज्यात केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा २ अंमलबजावणीस बुधवारी (ता. २८) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्यात केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा २ अंमलबजावणीस बुधवारी (ता. २८) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा २ ही योजना राबविण्याकरिता २०२५ पर्यंत एकूण ४६०१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. केंद्राचा यात ६० टक्के हिस्सा असून राज्याचा हिस्सा ४० टक्के आहे. आज झालेल्या बैठकीत राज्याच्या १८४०.४० कोटी इतका निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यास मान्यता देण्यात आली.

या योजनेची राज्यात राज्य पाणी व स्वच्छता मिशनमार्फत अंमलबजावणी होणार आहे. याकरिता राज्यस्तरावर मंत्री (पाणीपुरवठा व स्वच्छता) यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास मंत्री यांचे सहअध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येईल. अभियानास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. या अभियानात शौचालय बांधणी व्यतिरिक्त राज्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता शाश्‍वत स्वरूपात टिकविण्याच्या अनुषंगाने, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन या बाबींच्या अनुषंगाने काम करण्यात येईल.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026 : आगामी अर्थसंकल्पात डिजिटल कृषी अभियानासाठी निधीत वाढ होण्याची शक्यता

Organic Sugar Export: आता परदेशात जाणार भारताची सेंद्रिय साखर, ५० हजार टनांपर्यंत निर्यातीला परवानगी

Farm Road Scheme: बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत विभागीय कार्यशाळा

Sugarcane Nursery: सुपर केन नर्सरीचा अवलंब ऊस रोपे निर्मितीसाठी करावा

Garlic Planter: ट्रॅक्टरचलित लसूण टोकण यंत्र

SCROLL FOR NEXT