मुख्य बातम्या

संयुक्त खतांतून योग्य मात्रेत खते द्यावीत

नांदेड : रब्बी हंगामातील पिकांसाठी रासायनिक खते जिल्ह्यात उपलब्ध आहेत. परंतु शेतकऱ्यांचा कल डीएपी वापराकडे दिसून येतो. त्यामुळे बाजारात डीएपी खताची मागणी वाढली आहे.

टीम अॅग्रोवन

नांदेड : रब्बी हंगामातील पिकांसाठी रासायनिक खते जिल्ह्यात उपलब्ध आहेत. परंतु शेतकऱ्यांचा कल डीएपी वापराकडे दिसून येतो. त्यामुळे बाजारात डीएपी खताची मागणी वाढली आहे. उपलब्ध संयुक्त खतांमधून पिकांच्या शिफारशीप्रमाणे खतांची मात्रा देता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपी खताचा आग्रह न धरता संयुक्त खतातून पिकास योग्य मात्रेत खते द्यावीत’, असे आवाहन कृषी विभागाने केले.

जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकाची काढणी पूर्ण झाली. सध्या रब्बी हंगामातील पिकाची पेरणी सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने हरभरा व गहु ही पिके आहेत. यास पिकांसाठी बाजारात १०:२६:२६, १५:१५:१५, १२:३२:१६ व २०:२०:०:१३ ही संयुक्त खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश २४:२४:०० ही खतेही उपलब्ध आहेत.

पेरणी करताना संयुक्त खते द्यावीत. हरभरा पिकासाठी एकरी १० किलो नत्र, २० किलो स्फुरद, १२ किलो पालाश देण्यासाठी १०:२६:२६ हे ७५ किलो वापरल्यास एकरी १ हजार ७६५ रुपये किंवा १५:१५:१५ हे खत ५० किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट ५० किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश ४० किलो वापरल्यास २ हजार ४९२ रुपये किंवा डीएपी ७५ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश २५ किलो वापरल्यास २ हजार ३२० रुपये खर्च येतो. 

गहू (कोरडवाहू) पिकाला ४०:२०:० एकरी मात्रा देण्यासाठी २०:२०:०:१३ हे खत १०० किलो अधिक ५० किलो युरियामधून दिल्यास एकरी २ हजार ७६६ रुपये तसेच बागायती वेळेवर गहू पेरण्यासाठी ४०:२०:२० ही मात्र देण्यासाठी १०:२६:२६ हे खत ८० किलो अधिक युरिया ४३ किलो वापरल्यास एकरी ४ हजार ९४० रुपये खर्च येतो. 

उशिरा पेरण्यात येणाऱ्‍या गव्हासाठी एकरी ३२:१६:१६ नत्र, स्फुरद व पालाश देण्यासाठी १५:१५:१५ हे खत १०० किलो अधिक युरिया ४० किलो दिल्यास २ हजार ८१३ रुपये किंवा डीएपी ३५ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश ८० किलो अधिक ३५ किलो युरिया दिल्यास २ हजार ६९० रुपये खर्च येतो.  संयुक्त खते वापरल्यास खर्चात बचत होते. शिफारशीप्रमाणे मात्रा सुद्धा देता येतो. संयुक्त व इतर खतांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT