शिरोळमधील क्षारपड जमिनीच्या सर्वेक्षणासाठी ६० लाखांचा निधी मंजूर Of saline soils in the apex 60 lakh sanctioned for survey 
मुख्य बातम्या

शिरोळमधील क्षारपड जमिनीच्या सर्वेक्षणासाठी ६० लाखांचा निधी मंजूर

शिरोळ तालुक्यातील २७ गावांमधील क्षारपड जमिनीचे सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या रुपये ६० लाखांच्या निधीला मान्यता मिळाली असून, लवकरच सर्वेक्षणाच्या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन सर्वेक्षणाचे काम प्रत्यक्ष सुरू होईल.

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील २७ गावांमधील क्षारपड जमिनीचे सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या रुपये ६० लाखांच्या निधीला शासन मान्यता मिळाली असून, लवकरच  सर्वेक्षणाच्या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन सर्वेक्षणाचे काम प्रत्यक्ष सुरू होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.   यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीचे प्रमाण पाहता या जमिनींचा पोत सुधारण्यासाठीच्या योजना वेगवेगळ्या पद्धतीने राबवल्या जात आहेत, यासाठी यापूर्वीच महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे मंत्री जयंत पाटील यांनी क्षारपड जमीन सुधारणा योजनेसाठी अर्थसहाय्य देण्या बाबतची घोषणा केली होती. क्षारपड जमीन सुधारणा योजनांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्य व्हावे, या बाबत मी स्वतः आग्रही होतो, शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीची सद्यःस्थिती, क्षारपड जमिनीचे असणारे एकूण क्षेत्र, आणि या जमिनींची सुधारणा करण्यासाठी येणारा खर्च या बाबतची विस्तृत माहिती वेळोवेळी आपण जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांची भेट घेऊन दिली होती.  या जमिनीचे सर्वेक्षण व्हावे व जमीन सुधारण्यासाठी राज्य शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, अशी मागणी आपण १२ डिसेंबर २०२०ला लेखी निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून केली होती. या बाबत जलसंपदा मंत्री पाटील यांनी विभागाकडून शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनी बाबतचा अहवाल मागवला होता, याचाच भाग म्हणून आयुक्त पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनींच्या अहवालाच्या अनुषंगाने आहे. 

या गावांत होणार सर्वेक्षण शिरोळ तालुक्यातील दानोळी, कोथळी, उमळवाड, अर्जुनवाड, उदगाव, घालवाड, हसूर, कवठेसार, शिरटी, शिरोळ, शेडशाळ, कवठेगुलंद, गौरवाड, कुरुंदवाड, टाकवडे शिरढोण, नांदणी, अब्दुललाट, तेरवाड, बुबनाळ, आलास, मजरेवाडी, बस्तवाड, हेरवाड, अकिवाट, दत्तवाड व दानवाड अशा २७ गावांमधील क्षारपड जमिनीचे सर्वेक्षण या योजनेअंतर्गत पूर्ण होणार आहे. सर्वेक्षण पूर्ण होताच क्षारपड जमीन सुधारणा योजनेसाठी अर्थसाह्य मिळावे यासाठींच्या निकष पूर्ण करणाऱ्या प्रस्तावांना निधी मंजूर होण्यास राज्य शासनाकडून मदत होईल असेही यड्रावकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season: जळकोटमध्ये उसाचे क्षेत्र वाढणार

Jowar Pest Management: रब्बी ज्वारीवरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी सोप्या २ पद्धती

Traffic Diversion: अहिल्यानगर- पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Solar Pump Complaints: सौर पंपाबाबतच्या तक्रारींचे होणार निवारण

MGNREGA Congress protest : मनरेगासाठी काँग्रेसचे आंदोलन; ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाओ’ अभियान

SCROLL FOR NEXT