Reserved forestry area adds to the richness of nature 
मुख्य बातम्या

राखीव वनसंवर्धन क्षेत्रामुळे निसर्ग संपन्नतेत भर

नाशिक : नाशिक जवळील रामशेज किल्ल्यासमोर बोरगड हा डोंगर परिसर आहे. पर्यावरण संवर्धनासह जैवविविधता समृद्ध झाल्याने राज्यातील पहिल्या राखीव संवर्धन क्षेत्र नावारूपास आले. त्यामुळे नाशिकच्या निसर्ग संपन्नतेत मोठी भर पडली आहे.

टीम अॅग्रोवन

नाशिक : नाशिक जवळील रामशेज किल्ल्यासमोर बोरगड हा डोंगर परिसर आहे. पूर्वी येथे वृक्षतोड, शिकार,जंगल वणवे व बेकायदेशीर मानवी हस्तक्षेप वाढला होता. त्यामुळे वनसंपदा धोक्यात आली. यावर 'नेचर काँझर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक' ही संस्था गेल्या १५ वर्षांपासून येथे काम करत आहे. सोबतीला वन विभाग, भारतीय वायू सेना व काही कंपनी आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासह जैवविविधता समृद्ध झाल्याने राज्यातील पहिल्या राखीव संवर्धन क्षेत्र नावारूपास आले. त्यामुळे नाशिकच्या निसर्ग संपन्नतेत मोठी भर पडली आहे. 

मूळचे पश्चिम बंगाल येथील असलेले निसर्गप्रेमी विश्वरूप राहा यांनी १९९४ मध्ये निसर्ग संवर्धनाची चळवळ येथे सुरू केली. त्यातून पुढे 'नेचर काँझर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक'ही संस्था उभी राहिली. या संस्थेने २००५ साली वन विभाग आणि तुंगलदारा येथील आदिवासी बांधवांच्या सक्रिय सहभागाने व सामाजिक दातृत्वातून महाराष्ट्रातील पहिले राखीव संवर्धन क्षेत्र तयार केले.    

महिंद्रा आणि महिंद्रा यांच्या प्रायोजकतेने संस्थेने गेल्या काही वर्षात दीड लाख देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली आहे. त्यातील ८० टक्के झाडे जगविण्यात यश आले आहे. ज्यामध्ये ५०० प्रकारचे प्रजाती आणि औषधी वनस्पतींचा समावेश आहे.  वनक्षेत्र समृद्ध झाल्याने पक्ष्यांच्या १०५ प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या १० प्रजाती, सरपटणाऱ्या २० प्रजाती तसेच जगातील सर्वात मोठा पतंग 'अ‍ॅटलास मॉथ' यासारख्या अनेक फुलपाखरे आणि पतंग आढळून येतात आहेत. तर रानडुकरे, तरस, बिबटे मोर यांचा अधिवास मोठ्या प्रमाणावर येथे आहे.    शेती समृद्ध होतेय... 

पूर्वी जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होती. मात्र येथील आदिवासी बांधवांचे प्रबोधन करीत संस्थेने त्यांना मुख्य प्रवाहात आणले. येथील मिळणाऱ्या फळे, फुले व औषधी वनस्पतीवर त्यांची मालकी आहे. मात्र कुऱ्हाडबंदी व काही भागात नियंत्रित चराईबंदी आहे. मृदसंवर्धन व जलसंधारण केले आहे.  सामान्य नागरिक, स्थानिक आदिवासी बांधव, यासह वन विभाग व भारतीय वायू सेना, महिंद्रा अँड महिंद्रा या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून हरित बोरगड करण्यात यश आले.  - प्रतीक्षा कोठुळे, वन्यजीव शास्त्रज्ञ, प्रकल्प समन्वयक.  बोरगड राखीव संवर्धन क्षेत्रात जैवविविधता समृद्ध आहे. अनेक स्थलांतरित पक्षी  येतात. वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार केले आहेत. जंगलांना वणवे लागू नयेत यासाठी प्रतिबंधक उपाययोजना केल्या. त्यामुळे वनसंपदा समृद्ध झाली आहे.  - तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक, पूर्व वन विभाग.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT