Purnathadi buffalo was offered royal recognition
Purnathadi buffalo was offered royal recognition 
मुख्य बातम्या

पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव पडून

टीम अॅग्रोवन

अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट राखाडी रंगाच्या म्हशीला राजाश्रय मिळावा, तिची स्वतंत्र ओळख असावी या उद्देशाने भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन विभागाकडे दीड वर्षांपूर्वी प्रस्ताव देण्यात आला. मात्र हा प्रस्ताव अद्यापही मंजूर झालेला नाही. 

केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या या विभागाने लक्ष घातल्यास अकोला, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांत आढळणारी ही पूर्णाथडी म्हैस एक स्वतंत्र स्थान निर्माण करू शकेल.

संकरित म्हशींचे चलन वाढल्यापासून पारंपरिक जाती नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. पारंपरिक जातींमध्ये ही पूर्णाथडी म्हैस ओळखली जाते. पूर्णाथडी म्हैस विदर्भात प्रामुख्याने आढळणाऱ्या नागपुरी म्हशी म्हणूनच आज ओळखली जाते. मात्र नागपुरी म्हशींपेक्षा रंगाने फिकट राखाडी रंगाच्या म्हशी पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांतील पूर्णा नदीकाठी असलेल्या भागात विशेषत्वाने आढळतात. स्थानिक पातळीवर यांना भुरी, राखी, गावळी या नावांनीही संबोधले जाते. मध्यम आकारमान, दुधातील स्निग्धाच उच्च प्रमाण, उत्तम प्रजनन क्षमता, कमी व्यवस्थापन खर्च आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विदर्भातील उष्ण हवामानात तग धरून राहण्याची क्षमता या गुणधर्मामुळे लघू आणि मध्यम म्हैसपालकांमध्ये पूर्णाथडी म्हैस विशेष लोकप्रिय आहे.

या म्हशींना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्थेतील पशू अनुवांशिकी व पैदास शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शैलेंद्र कुरळकर यांनी सन २०१६ पासून याबाबत काम सुरू केले. सहकाऱ्यांसह त्यांनी पूर्णा खोऱ्यातील हा पैदासक्षेत्राचा भाग पालथा घालत या म्हशीचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी ‘माफसू’कडे प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव पशुधन विभागामार्फत राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन विभागाकडे (कर्नाल) पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची गरज आहे. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या म्हशीच्या जातीबाबत डॉ. साजिद अली यांनी शोधप्रबंधही लिहिला आहे. या म्हशीला ओळख मिळाल्यास म्हशीची किमत वाढेल. प्रचार-प्रसार होईल. तसेच योजनांमध्येही या जातीच्या म्हशीचा समावेश होईल. पालनपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल.

पूर्णाथडी म्हशीचे वैशिष्ट्ये  पूर्णाथडी म्हैस दिवसाला साधारणत ः ४ ते ५ लिटर दूध देते आणि एका वेतात (सरासरी २५० दिवस) १००० किलोग्राम दूध देते. दोन वेतातील अंतर सरासरी ४५० दिवस असून पहिल्यांदा विण्याचे वय हे साधारण ५ वर्षे एवढे आढळते. पूर्णाथडीच्या दुधात स्निग्धाच प्रमाण सरासरी ८.५ टक्के असल्याने स्थानिक म्हैसपालकांनी पूर्णाथडी म्हशीची निवड करण्यास नेहमीच झुकते माप दिले आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज पूर्णाथडीला राजमान्यता मिळण्याच्या दृष्टीने केंद्रात या भागाचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. छोट्या-छोट्या बाबींसाठी हा प्रस्ताव पुढे जाऊ शकलेला नाही. राज्यशासन, लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला तर एका जातीच्या म्हशीला मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT