Pune News: बिबट-मानव संघर्ष विकोपाला गेलेल्या पुणे जिल्ह्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात राज्य शासनाने मोठे फेरबदल केले आहेत. पुणे विभागातील सहायक वनसंरक्षकांच्या (वर्ग १) कार्यक्षेत्रांचे फेरवाटप करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. .परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे मनुष्यबळ पर्यवेक्षणात वारंवार समस्या उद्भवत होत्या. त्याचा थेट फटका बिबट मानव संघर्षावर नियंत्रण मिळविण्याच्या नियोजनालादेखील बसत असल्याचे निदर्शनास आले होते..Forest Department: वाघाच्या वावरामुळे पाचावर धारण .“वनांचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन होण्यासाठी महाराष्ट्र वनसंहितेमधील (खंड एक) तरतुदी विचारात घेत वनकार्यक्षेत्रांचे नव्याने विभाजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनीदेखील त्यांच्या अडचणीसंदर्भात नवे फेरबदल विचारात घेत संबंधित कार्यालयांकडे संपर्क करावा,” अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली..Forest Department : मंजूर आराखड्यांचा वन विभागाच्या नियोजनात समावेश करा.अशी असतील सुधारित कार्यक्षेत्रेसहायक वनसंरक्षक (वर्ग एक) – पुणे विभाग क्षेत्र : पुणे, भांबुर्डा, सासवडसहायक वनसंरक्षक (वर्ग एक) - बारामती विभाग क्षेत्र : बारामती, इंदापूर, दौंडसहायक वनसंरक्षक (वर्ग एक) – मावळ विभाग क्षेत्र : वडगाव, शिरोता, पौडसहायक वनसंरक्षक (वर्ग एक) – भोर विभाग क्षेत्र : भोर, नसरापूर, वेल्हे.फेरबदलामुळे होणार असे फायदेसंवेदनशील क्षेत्रांत अधिकारी व मनुष्यबळाचे प्रभावी वाटपवन्यजीवांच्या हालचालींचे जलद आणि शास्त्रीय निरीक्षण करून मनुष्यबळाची वेळेत उपलब्धतागस्त, बचाव (रेस्क्यू) आणि अटकाव (ट्रॅपिंग) कार्यात अचूक समन्वयपुण्यातील बिबट–मानव संघर्ष नियंत्रणासाठी नियोजन होणार सोपे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.