The price of a trumpet in Akot is Rs 6400 
मुख्य बातम्या

अकोटमध्ये तुरीला ६४०० रुपयांचा दर

अकोला ः कापसाला उच्चांकी दर मिळवून देणाऱ्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीलाही इतर बाजार समित्यांमधील दरांपेक्षा अधिक दर मिळत आहेत. बुधवारी (ता. ५) या बाजारात सुमारे दीड हजार पोत्यांची आवक झाली. तुरीला कमाल दर ६४२५ रुपये मिळाला. इतर बाजारांमध्ये तुरीचा दर हा ६२०० च्या आतच मिळत आहे.

टीम अॅग्रोवन

अकोला ः कापसाला उच्चांकी दर मिळवून देणाऱ्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीलाही इतर बाजार समित्यांमधील दरांपेक्षा अधिक दर मिळत आहेत. बुधवारी (ता. ५) या बाजारात सुमारे दीड हजार पोत्यांची आवक झाली. तुरीला कमाल दर ६४२५ रुपये मिळाला. इतर बाजारांमध्ये तुरीचा दर हा ६२०० च्या आतच मिळत आहे.

अकोट बाजार समितीत नव्या तुरीची आवक सुरू झाली आहे. येथील आवक दररोज वाढत आहे. बुधवारी बाजार समितीत १५१० क्विंटल तुरीची आवक झाली होती. तुरीला किमान दर ५१५० रुपये, तर कमाल दर ६४२५ रुपये दर मिळाला आहे.  जिल्ह्यात नवीन तुरीची काढणी काही भागांत सुरू झाली आहे. या ठिकाणी खुल्या पद्धतीने खरेदी होत असल्याने चांगल्या मालाला दर मिळत आहे. यामुळे येथे तुरीला ६४२५ रुपयांचा यंदाचा सर्वाधिक दर मिळाला. 

खामगावमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या खामगाव बाजार समितीत तुरीची विक्री दिवसेंदिवस वाढत आहे. या बाजारात तूर (चारू) ५९०० ते ६४०० आणि तूर (मारुती) ५५०० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. 

तुरीचा सरासरी दर हमीभावाच्या आत

यंदा तुरीला ६३०० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर झाला आहे. सध्या कुठल्याही बाजारात तुरीला सरासरी दर मिळेनासा झाला आहे. उच्चांकी दर काही मोजक्याच मालाला मिळत आहे. त्यानंतर उर्वरित माल हा साडेपाच हजारांच्या आतच मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisin Price: राज्यातील बेदाण्याचे दर टिकून राहण्याचे अंदाज

Banana Export: आखाती देशातील युद्धविरामाने केळी निर्यात सुरू

CM Devendra Fadnavis: गायकवाड यांच्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करू: मुख्यमंत्री

National Agri Market: राष्ट्रीय बाजारासाठी मुख्यमंत्री सकारात्मक

Monsoon Rain: उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT