Presence of rains in many parts of Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरी

खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पेरणीयोग्य पाऊस मात्र कुठेही झालेला नाही.

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पेरणीयोग्य पाऊस मात्र कुठेही झालेला नाही. 

बुधवारी (ता. १६) सायंकाळी ढगांची जमवाजमव झाली आणि हलका पाऊस सुरू झाला. यानंतर रात्रीदेखील अधूनमधून सरी कोसळत होत्या. यामुळे वातावरणात गारवा तयार झाला, पण कुठेही पाऊस वाहून निघाला नाही. यामुळे अतिवृष्टी झाल्याची माहितीदेखील नाही. पेरण्यांसाठी किमान ४० ते ६० मिलिमीटर पावसाची आवश्यकता आहे. 

पेरणीयोग्य पाऊस खानदेशात कुठेही झालेला नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, अमळनेर, भुसावळ, जामनेर, यावल आदी भागांत पाऊस झाला. धुळ्यात शिंदखेडा, धुळे, शिरपूर येथे पाऊस झाला. तर नंदुरबारातही  तळोदा, शहादा, अक्कलकुवा आदी भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती मिळाली. गुरुवारी (ता. १७) सकाळपासून पावसाळी वातावरण होते. उकाडा, ढगांची जमवाजमव, अशी  स्थिती होती. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण खानदेशात पावसाची अनेक दिवस प्रतीक्षा होती. जोरदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. 

कापूस व इतर कोरडवाहू पिकांची पेरणी लांबत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कोपूस, ज्वारी, सोयाबीन, तुरीची पेरणी वेळेत किंवा २० जूनपूर्वी व्हायला हवी, असा मुद्दा  शेतकरी उपस्थित करीत आहेत. पण पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागलेले नाहीत, असे चित्र आहे. बुधवारचा पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः जळगाव २१, चोपडा १४, धरणगाव ११, एरंडोल १३. धुळे १७, शिंदखेडा ११, नंदुरबार १४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwari Chilli: संकेश्वरी मिरचीचा हंगाम अतिवृष्टीमुळे कोमेजला

Sugarcane Price Protest: ऊसदरासाठी ‘संघर्ष समिती’च्या ठिय्या आंदोलनास सुरुवात

Flower Farmer Issue: बाजारभावातील घसरणीमुळे झेंडू उत्पादक अडचणीत

Florida Citrus Varieties: फ्लोरिडातील संकरित लिंबूवर्गीय जाती महाराष्ट्रासाठी फायदेशीर

Vidarbha Irrigation Project: हुमन प्रकल्प रखडल्याने ४६ हजार हेक्टर क्षेत्र कोरडे

SCROLL FOR NEXT