Planning of kharif sowing on two lakh 82 thousand hectares in Solapur 
मुख्य बातम्या

सोलापुरात दोन लाख ८२ हजार हेक्टरवर खरिप पेरणीचे नियोजन

खरिपासाठी आराखडा आखला आहे. खते आणि बियाण्यांच्या पुरेशा उपलब्धतेकडे लक्ष देत आहोत. यंदा पेरणीबरोबरच अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी उद्दिष्ठ निश्चित केले आहे. - बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

टीम अॅग्रोवन

सोलापूर : आगामी खरीप हंगाम २०२० साठी जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून अद्याप फारशी तयारी नसली, तरी कृषि विभाग मात्र तयारीला लागल्याचे चित्र आहे. खते आणि बियाण्यांची पुरेशी उपलब्धता करण्याबरोबरच पेरणीसाठी आवश्यक ती तयारी प्रशासकीय पातळीवर सुरु आहे. यंदाच्या खरीप हंगामात दोन लाख ८२ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन कृषि विभागाने केले आहे. 

प्रामुख्याने या हंगामात बाजरीचे ५० हजार हेक्टर, मका २९ हजार हेक्टर, तूरीचे ८६ हजार ८०० हेक्टर, उडदाचे ३६ हजार ००० हेक्टर, मूग - २० हजार ००० हेक्टर, सूर्यफूल - ९००० हेक्टर, सोयाबीन - ४६ हजार ५०० हेक्टर , ऊस - १ लाख २५,००० हेक्टर असे उद्दिष्ठ ठरवण्यात आले आहे. 

यंदा तृणधान्याचे ५६ हजार ८१६ मेट्रीक टन, कडधान्याचे ७६ हजार ९५५ मेट्रीक टन असे अन्नधान्याचे एकूण १ लाख ३३ हजार ७७१ मेट्रीक टनाचे उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. गळित धान्याचे ४४ हजार ५११ मेट्रीक टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. गेल्या दोन वर्षापासून खरिपात तूर, उडीद, मका आणि सोयाबीनच्या पेरणीत वाढ होत आहे. यंदा प्रत्येक तालुक्यातील पाच गावांची मॉडेल व्हिलेज म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानुसार ५५ गावांतील ५३ हजार ५६६ खातेदारांचे मृदा नमुने काढण्याचे नियोजन आहे.  खते, बियाणे उपलब्ध 

यंदा हंगामात ३१ हजार ९७३ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. त्यांपैकी १०८० क्विंटल बियाणे आले आहे. उर्वरित बियाणे महाबीज आणि खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होईल. रासायनिक खतांमध्ये २ लाख ११ हजार ३९० मेट्रीक टन खतांची मागणी आहे. त्यापैकी एप्रिल महिन्यात २० हजार ६५५ मेट्रीक टन खत उपलब्ध आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनच्या आधीच होईल, कृषिमंत्री भरणेंची महत्त्वाची माहिती

Medical Assistance Fund: वैद्यकीय साह्यता निधीतून २० कोटींची मदत

Fertilizer Demand: खरिपासाठी १.७४ लाख टन खतांची गरज

Tiger Attack: पशुधन विकास अधिकाऱ्यांसह चौघांवर वाघाचा हल्ला

Jairam Ramesh: अमेरिका-इराण चर्चेत पाकिस्तान बनला शांतिदूत?; मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाला धक्का, काँग्रेसची जोरदार टीका

SCROLL FOR NEXT