महाराष्ट्रातील रुग्णसंख्या मे महिन्यात होणार कमी The number of patients in Maharashtra will decrease in May 
मुख्य बातम्या

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या मे महिन्यात होणार कमी

देशात मे महिन्याच्या मध्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मे महिन्यात देशात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. याच वेळी महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या घसरण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली : देशात मे महिन्याच्या मध्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मे महिन्यात देशात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. याच वेळी महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या घसरण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. आयआयटी कानपूर आणि हैदराबादमधील ‘शास्त्रज्ञांनी ससेप्टिबल, अनडिटेक्टेड, टेस्टेड, रिमूव्ह्ड अॅप्रोच’ (सूत्र) गणितीय पद्धतीने हा अंदाज व्यक्त केला आहे. 

देशातील कोरोनाच्या दुसरी लाट मे महिन्याच्या मध्यात सर्वाधिक वाढेल. दिल्ली, हरियाना, राजस्थान आणि तेलंगण या राज्यात २५ ते ३० एप्रिल दरम्यान जास्त रुग्ण आढळतील. याच वेळी महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यात आताच कोरोनाच्या रुग्णसंख्येने शिखर गाठले असून, ती ओसरू लागेल, अशी शक्यता आहे.

देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ११ ते १५ या काळात ३३ ते ३५ लाखांवर जाईल. याच बरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर गाठल्यानंतर तेवढ्यात वेगाने ती खाली येईल. मे महिन्याच्या अखेरीस लाट कमी होऊ लागेल आणि रुग्णसंख्याही कमी होईल, अशी माहिती आयआयटी कानपूरमधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक महिंद्र अग्रवाल यांनी दिली. 

२४ तासांत ३ लाख ४६ हजार रुग्ण देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता १ कोटी ६६ लाख १० हजार ४८१ झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ८९ हजार ५४४ झाली आहे. शनिवारी (ता.२४) सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत कोरोनाचे नवीन ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्ण सापडले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २५ लाखांवर गेली आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या सलग ४५ व्या दिवशी वाढली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २५ लाख ५२ हजार ९४० असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण १५.३७ टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते ८३.४९ टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ३८ लाख ६७ हजार ९९७ आहे. याचवेळी मृत्युदर १.१४ टक्का आहे.

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे

  •  २० लाख : ७ ऑगस्ट  (२०२०) 
  •  ३० लाख : २३ ऑगस्ट  
  •  ४० लाख : ५ सप्टेंबर  
  •  ५० लाख : १६ सप्टेंबर
  •  ६० लाख : २८ सप्टेंबर
  •  ७० लाख : ११ ऑक्टोबर  
  •  ८० लाख : २९ ऑक्टोबर  
  •  ९० लाख : २० नोव्हेंबर
  •  १ कोटी : १९ डिसेंबर
  •  १.५ कोटी : १९ एप्रिल (२०२१)
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Rakesh Tikait: महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव होऊ देणार नाही

    Contractual Workers: कंत्राटी साखर कामगारांना कायम केल्यास स्थैर्य 

    Natural Farming: शाश्वत जीवनशैलीसाठी नैसर्गिक शेती आवश्यक

    Urea Supply: राज्यात युरियाचा पुरवठा तातडीने करा: कृषिमंत्र्यांकडून केंद्राला पत्र

    Crop Loss: पावसामुळे भिजून कोथिंबीर मातीमोल

    SCROLL FOR NEXT