New technology required for rural development: Suresh Prabhu 
मुख्य बातम्या

ग्रामीण विकासासाठी नवतंत्रज्ञान आवश्‍यक ः सुरेश प्रभू

निसर्गाचा समतोल राखून ग्रामीण विकास कसा करता येऊ शकतो याचे नवतंत्रज्ञान जिल्ह्यातील शेतकरी आणि मच्छीमारांना देणे आवश्यक असल्याचे मत माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे व्यक्त केले.

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः निसर्गाचा समतोल राखून ग्रामीण विकास कसा करता येऊ शकतो याचे नवतंत्रज्ञान जिल्ह्यातील शेतकरी आणि मच्छीमारांना देणे आवश्यक असल्याचे मत माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे व्यक्त केले.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक आणि लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सात कंपन्यांचे संचालक, मुख्याधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुडाळ येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मानव साधन विकास संस्थेच्या उमा प्रभू,  राजन तेली, नाबार्डचे संचालक अजय थुटे, योगेश प्रभू, अतुल काळसेकर, नकुल पार्सेकर आदी उपस्थित होते.

श्री. प्रभु म्हणाले, की शेतकऱ्यांबरोबर जिल्ह्यातील मच्छीमार निसर्गावर अवलंबून असतात. त्यांना निसर्गाशी सुसंगत असे तंत्रज्ञान प्रशिक्षणामधून दिल्यास विकास प्रक्रियेतून सुवर्णमध्य साधता येईल. कोकणातील शेतकरी मनाने भक्कम आहे. त्यामुळे तो कधीही आत्महत्येचा विचार करीत नाही. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिल्यास ग्रामीण विकास प्रकियेत क्रांती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाबार्ड आणि लुपिनने स्थापन केलेल्या कंपन्यांकडून त्या अनुषंगाने काम करणे अपेक्षित आहे. ग्रामीण विकासात या कंपन्यांनी भर देण्याची सध्या गरज निर्माण झालेली आहे. या कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Daryapur APMC : दर्यापूर बाजार समितीची कपाशी, हरभऱ्यात ओळख

Cotton Procurement: कापूस उत्पादक शेतकरी संतप्त, क्विंटलमागे १ हजार रुपयांचे नुकसान

Animal Husbandry: पशुपालनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य

Fruit Crop Insurance: आंबिया बहरातील फळपिकांसाठी विमा योजना

Economic Growth : रहस्य शाश्वत आर्थिक वाढीचे!

SCROLL FOR NEXT