cotton-seeds 
मुख्य बातम्या

कापूस बियाणे विक्रीसाठी प्रेरक ठरला नागपूर पॅटर्न 

गटांमार्फत कॉलनींमध्ये भाजीपाला, फळे व धान्य पुरवठा झाला. त्यामुळे गर्दी टाळता आली व सोशल डिस्टन्सिंग पाळता आले. हाच पॅटर्न बियाणे वितरणासाठी असावा. त्यासोबतच याकरिताचा वाहतूक खर्च तसेच ऑनलाइन ॲपवरील खर्च बियाणे कंपन्या, विक्रेत्यांनी सिएसआर फंडमधून करावा, अशा प्रकारच्या मार्गदर्शक सुचनांची शिफारस केली होती. याच पॅटर्ननुसार आता राज्यात कापूस बियाणे विक्र्री होणार आहे. - रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर

टीम अॅग्रोवन

नागपूरः लॉकडाऊनच्या काळात शेतकरी गटांमार्फत भाजीपाला, फळे विक्रीचा प्रयोग यशस्वी झाला. तीच कार्यपध्दती कापूस बियाणे विक्रीकरीता अंमलबजावणीची शिफारस नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने केली होती. कापूस बियाणे विक्रीसाठीचे हे मॉडेल कृषी आयुक्‍तालयालाही भावल्याने या मॉडेलची अंमलबजावणी आता राज्यस्तरावर केली जात आहे. 

लॉकडाऊनमुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यातच कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागात निर्बंध अधिकच कडक करण्यात आले. खरीप हंगाम तोंडावर असताना निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे कापूस बियाणे वितरणही प्रभावीत होण्याची भिती होती. बियाणे वितरण खूप आधी केल्यास राज्यात पूर्वहंगामी पेरणी होत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाववाढीचेही संकट घोंगावत होते. यातून सुवर्णमध्य काढण्यासाठी आयुक्‍तालयस्तरावरुन केंद्रीय कापूस संशोधन संस्था तसेच कृषी सहसंचालकांना मार्गदर्शन मागविण्यात आले होते. 

ढगाळ वातावरण व लांबलेल्या हंगामामुळे बियाणे विक्री कोणत्याही परिस्थिती १ मे रोजी नको, असेही विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने म्हटले होते. काही कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडामधून बियाणे वाहतूकीचा तसेच ऑनलाइन नोंदणीकरीता विकसीत ॲपच्या खर्चाचा भार उचलावा, अशीही शिफारस आहे.  अशा आहेत शिफारसी 

  • २५ मे पर्यंत तालुकास्तरावरील विक्रेत्यांना बियाणे पुरवठा परंतु विक्रीस मनाई. 
  • बियाणे मुबलक असल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती. 
  •  शेतकरी गटामार्फत बियाणे व खते पुरवठा. 
  • बियाणे वितरणाकरीता कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षक यांची समन्वयक म्हणून नियुक्‍ती. 
  • ज्या विक्रेत्यांना शक्‍य आहे त्यांनी निविष्ठा नोंदणीकरीता ॲप तयार करावे. 
  • मोठी मागणी असल्यास विक्रेत्यांनी घरपोच बियाणे पुरवठा करावा. 
  • यामाध्यमातून ५० त ६० टक्‍के बियाणे विक्री झाल्यास गर्दी टळेल. 
  • याकरिता समयबध्द कार्यक्रम जाहिर करावा
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

    Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

    White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

    Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

    Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

    SCROLL FOR NEXT