बैल पोळा सणाच्या तोंडावर बाजार सुनासुना  The market is buzzing with bullfighting
बैल पोळा सणाच्या तोंडावर बाजार सुनासुना  The market is buzzing with bullfighting 
मुख्य बातम्या

बैल पोळा सणाच्या तोंडावर बाजार सुनासुना 

टीम अॅग्रोवन

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांसमोर संकट असताना शेतमालाचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातच बैलांची संख्या कमी झाल्याने शेतकऱ्यांचा साहित्य खरेदीला गर्दी कमी असल्याचे दिसून येते.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मंदी, शेतीमालाचे नुकसान व नसलेले दर यामुळे शेतकरी समस्यांचा सामना करत आहे. चालू वर्षीच्या खरीप हंगामात वेळेवर पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे फुलणारा बैल पोळ्याचा बाजार सुनासुना असल्याचे पाहायला मिळत आहे. दर वर्षी पोळ्याला बैलांना सजविण्यासाठी गळ्यातील घुंगरमाळ, कपाळाचे बाशिंग, बेगड, शिंगाचे गोंडे, बैलांचा रंग, रंगीत पट्ट्या, नवीन कासरे, दावे आदी अशा साहित्याने बाजारपेठ भरलेली असते. चालू वर्षी बाजारपेठ कमी प्रमाणात दुकाने थाटली आहेत. बैलांना सजविण्याची तयारी पोळ्याच्या आठ दिवस आधी सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांची खरेदीसाठी लगबग वाढत असते; मात्र या वर्षी साहित्य विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा असल्याचे पाहायला मिळाले.    नाशिक शहरात पंचवटी परिसरात निमानी, पेठ नाका, बाजार समिती व्यापारी संकूल, सातपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटलेली असतात. मात्र शेतकऱ्यांची गर्दी  कमीच आहे. दोन महिन्यापासून शेतीमाला भाव नाही. यंदा सणावर कोरोना, कमी पावसाचे सावट दिसून येते आहे. शेतकऱ्यांना दुहेरी फटाक्यांमुळे बाजारपेठ शांतच  घटलेले उत्पन्न व त्यातच ओढावलेले कोरोनाचे संकट याचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला आहे. एकीकडे बैलांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच शिल्लक राहिली आहे. त्यांची यांत्रिकीकरणाने घेतली आहे. त्यातच चालू वर्षी हा उत्साह अन् बाजारपेठ न फुलल्याने शांत आहे.  पावसाच्या अनियमिततेचे  बैल पोळ्यावर सावट  पाचोरा, जि. जळगाव : बळिराजाला बळ देणारा सच्चा साथीदार सर्जा-राजाच्या पूजनासाठी पवित्र मानला जाणारा पोळा सण यंदा दुष्काळाच्या सावटाखाली आहे. चार दिवसांवर सण आलेला असताना पोळ्याच्या साहित्य खरेदीसाठी मात्र उत्साह दिसेनासा झाला आहे.  सोमवारी (ता. ६) पोळा सण साजरा होत असून, या सणानिमित्ताने बळिराजाला सतत बळ देणारा सच्चा मित्र असलेल्या बैलांचे पूजन करून त्यांना गोडधोड घास खाऊ घातला जातो. या दिवशी सर्जा-राजाच्या खांद्यावर बैलगाडीची दूशेर ठेवली जात नाही. शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी असलेल्या पोळ्यानिमित्त सर्जा-राजाला स्वच्छ अंघोळ करून त्याची पूजा करून पुरणपोळीचा गोड नैवेद्य दिला जातो. यानिमित्ताने सर्जा-राजासाठी लागणारे विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, दोरखंड, घुंगरांच्या माळा खरेदी केल्या जातात व पोळ्याच्या दिवशी सर्जा-राजाला त्याचा साजशृंगार करून वर्षभर त्या वस्तू वापरल्या जातात. यंदा हा सण दुष्काळी सावटाखाली आलेला दिसत आहे.  या वर्षी रोहिण्या बरसल्या, मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदात पेरण्या उरकल्या. परंतु त्यानंतर वरुणराजाने दडी मारल्याने बळीराजा प्रचंड खचला. दुबार, तिबार पेरणी झाली आता खरिपाचे उडीद, मूग, तीळ, कापूस हे उत्पादन शेतकऱ्याच्या हाती येण्याचे सुचिन्ह असताना दमदार पावसाने हजेरी लावून हातातोंडाशी आलेला घास नष्ट होत आहे. त्यामुळे बळीराजा प्रचंड आर्थिक विवंचनेत अडकला असल्याने पोळा सणानिमित्ताने सर्जा-राजा लागणारे साहित्य खरेदी करण्याइतपत बळीराजाची आर्थिक क्षमता राहिलेली नाही. गेल्या तीन-चार वर्षांपासून असलेले दुष्काळाचे सावट या वर्षीही कायम असल्याने पोळ्यानिमित्त खरेदीसाठी दुकानांवर गर्दी दिसत नाही. स्थानिक विक्रेत्यांनी पोळ्यानिमित्ताने विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य विक्रीसाठी आणले असले तरी खरेदीसाठी मात्र शुकशुकाट दिसत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT