water  
मुख्य बातम्या

महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणास दुसऱ्यांदा राष्ट्रीय जल पुरस्कार

जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे राष्ट्रीय जल पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले.

टीम अॅग्रोवन

पुणे ः  जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे राष्ट्रीय जल पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले. २०१९ साठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणास देशातील सर्वोत्कृष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरण म्हणून सलग दुसऱ्यांदा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील उपलब्ध जलसंपत्तीचे न्यायोचित, समन्यायी व टिकाऊ वितरण व व्यवस्थापन करण्यासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरण स्थापन केले आहे. राज्यातील भू-पृष्ठावरील उपलब्ध जलसंपत्तीचे तसेच भू-जलाचे हे प्राधिकरण नियमन करते. तसेच प्राधिकरणाने स्वायत्तपणे जनहितार्थ घेतलेले निर्णय व त्यांच्या अंमलबजावणीने जलक्षेत्रात झालेला सकारात्मक परिणाम, पाण्याचा काटेकोर वापर, जल प्रदूषणावर नियंत्रण, सांडपाण्याचा पुनर्वापर यासाठी केलेली जनजागृती यांचा सर्वंकष विचार करून केंद्र शासनाने देशातील सर्वोत्कृष्ट जल नियमन प्राधिकरण या संवर्गातील प्रथम पुरस्कारासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची सलग दुसऱ्यांदा निवड केली आहे. दुसऱ्यांदा प्रथम पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण हे देशातील पहिलेच प्राधिकरण ठरले आहे. प्राधिकरणाने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याने जलक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. पाण्याचा काटकसरीने वापर, पुनर्वापर, सांडपाणी व्यवस्थापन व जलपुनर्भरण या क्षेत्रात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाण्याच्या अधिकाराला जीवन जगण्याचा मूलभूत मौलिक अधिकार म्हणून संवैधानिक मान्यता असल्याचे स्पष्ट केल्यानंतर महाराष्ट्रातील प्राधिकरणाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण आदेश पारित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान धन धान्य योजनेला मान्यता; २४ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार

Crop Insurance Delay: विमा कंपनीकडे थकला १०० कोटींचा परतावा

Lumpy Skin Disease: ‘लम्पी’ची लक्षणे आढळलेल्या १०० जनावरांवर उपचार सुरू

Harnbari Dam: द्वारकाधीश कारखान्याकडून हरणबारी धरणाचे जलपूजन

Landslide Risk: दोन गावांतील ८०० जीव दरडीच्या छायेत

SCROLL FOR NEXT