अशोक चव्हाण 
मुख्य बातम्या

अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी; तर विखेंबाबत लवकरच निर्णय : चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

जालना ः  पक्षाविरोधात काम केल्यामुळे अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करण्यात आली असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबतीतही लवकरच निर्णय होईल, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. 

जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता. २०) भोकरदन शहरात जाहीर सभा झाली. त्यानंतर पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्त्तरे देताना त्यांनी ही माहिती दिली. सभेत ते म्हणाले, की निवडणुकीच्या काळात काही जणांनी पक्षाविरोधात भानगडी केल्या. जालना व औरंगाबाद मतदारसंघाची उमेदवारी ठरविताना सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्यास विरोध केला. त्यानंतरही पक्षाने त्यांना उमदेवारी देण्याची तयारी दर्शविली. मात्र, ते औरंगाबादमधूनही उभे रहिले नाहीत. उलट दोन्ही ठिकाणी वेगळी भूमिका घेतली. पक्षात असे चालणार नाही. 

प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आरोप चुकीचे असून, मी निवडणुकीत १०० कोटी खर्च केले असतील आणि माझ्या सासूच्या नावावर ४ फ्लॅट असतील, तर त्याची चौकशी करा, असेही चव्हाण म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी चव्हाण यांच्यावर लोकसभा निवडणुकीत १०० कोटी रुपये वाटल्याचा आरोप केला होता; त्यावर चव्हाण यांनी उत्तर दिले. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहमत आहेत का, असा सवाल देखील चव्हाण यांनी उपस्थित केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department LOGO : कृषी विभागाचं नवीन 'बोधचिन्ह' आणि 'घोषवाक्य' ठरलं; राज्य सरकारचा निर्णय

Hawaman Andaj: राज्यात थंडी वाढायला सुरुवात; उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट

Post Harvest Tips: काढणीपश्‍चात साठवणीतील नुकसानीची कारणे

PDKV Akola: आत्मनिर्भरतेसाठी राष्ट्र हाच धर्म मानून प्रयत्न हवे; डॉ. गडाख

Rabi Season: रब्बी लागवड अवघी ८.१८ टक्के

SCROLL FOR NEXT